शर्लिन चोप्रा काढून टाकणार हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट, हॉस्पिटलमधून शेअर केला VIDEO, सांगितलं भयंकर कारण
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : भारतीय मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीचं ब्रेस्ट इम्प्लांट झालं असून तिला आता प्रचंड त्रास होत आहे.
Bollywood Actress : भारतीय मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शर्लिनने आजवर अनेक हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने 2007 मध्ये 'रेड स्वस्तिक' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच 'बिग बॉस ओटीटी' या लोकप्रिय कार्यक्रमातदेखील ती सहभागी झाली आहे. पण शर्लिन सध्या कोणत्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आलेली नाही. शर्लिनने ब्रेस्ट इम्प्लांट केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी विविध शस्त्रक्रिया करत असतात. आता शर्लिनचीही यात भर पडली आहे. ब्रेस्ट इम्प्लांटनंतर आता शर्लिनला प्रचंड त्रास होत आहे. असह्य होणाऱ्या वेदनांमुळे शर्लिनची प्रकृतीदेखील बिघडली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सांगितले की तिने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली आहे. फिलर्स आणि सिलिकॉन सर्जरीविषयीही अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. शर्लिन चोप्राने रुग्णालयाच्या बेडवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणतेय की, ब्रेस्ट इम्प्लांटमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तिने ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिला आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल.
advertisement
शर्लिन आपल्या पोस्टमध्ये म्हणाली की,"2023 मध्ये तिने फिलर्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरुन ती नॅचरल दिसू शकते. आता तिने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी करण्याचे ठरवले आहे. शर्लिन म्हणाली की तिला आता आयुष्यात कोणताही भार वाहायचा नाही. तिने हेही स्पष्ट केले की तिचा हा निर्णय फिलर्स किंवा सिलिकॉन इम्प्लांट्सविरोधात नाही, तर ही तिची स्वतःची निवड आहे जी ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
advertisement
advertisement
शर्लिन चोप्रा काय म्हणाली?
view commentsशर्लिन चोप्रा म्हणाली,"मित्रांनो, मला गेल्या काही दिवसांपासून पाठदुखी, मानदुखीचा त्रास होत असून छातीतदेखील प्रचंड दुखत आहे. आरोग्यासंबंधी अनेक समस्या भेडसावत आहेत. मी अनेक वैद्यकीय तपासण्या केल्या. डॉक्टरांशी चर्चा आणि तपासणीनंतर मला समजले की माझ्या या ब्रेस्टमुळेच मला पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे मी माझी ऊर्जा, सहनशक्ती आणि आयुष्यातील सकारात्मकता टिकवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लांट्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
शर्लिन चोप्रा काढून टाकणार हेव्ही ब्रेस्ट इम्प्लांट, हॉस्पिटलमधून शेअर केला VIDEO, सांगितलं भयंकर कारण


