पलाशची आई खोटं बोलली? त्या वक्तव्यानंतर 5 दिवसांतच स्मृतीने 'सासूबाईं'ना उघडं पाडलं

Last Updated:

Smriti Mandhana Palash Muchhal : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. असा दावा पलाशच्या आईने केला होता. पण त्यानंतर 5 दिवसांत स्मृतीने 'सासूबाईं'ना उघडं पाडलंय.

News18
News18
Smriti Mandhana Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल 23 नोव्हेंबर 2025 रोजी विवाहबंधनात अडकणार होते. संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांच्या शाही विवाहसोहळ्याकडे लक्ष लागलं होतं. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्याचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पुढे पलाशचीदेखील प्रकृती बिघडली. पण त्यानंतर पलाशबद्दलच्या अनेक चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं. दरम्यान हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना अमिता मुच्छलने गुड न्यूज दिली. अमिता मुच्छल यांनी स्मृती आणि पलाश यांच्या नात्याला हिरवा कंदील दाखवला होता. त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली. पण त्यांच्या त्या वक्तव्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत स्मृती मानधनाची लग्न मोडल्याची पोस्ट समोर आली आहे. त्यामुळे पलाशची आई खोटं बोलली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अमिता यांच्या त्या वक्तव्यानंतर 5 दिवसांतच स्मृतीने होणाऱ्या सासूबाईंना उघडं पाडलं आहे.
पलाशची आई काय म्हणालेली?
पलाशची आई मीडियासोबत बोलताना म्हणालेली,"स्मृती मानधना आणि पलाश दोघंही सध्या कठीण काळातून जात आहेत. पलाशने आपल्या पत्नीबरोबर घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मीदेखील स्मृतीच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सगळं ठीक होईल, असा विश्वास पलाशच्या आईने व्यक्त केला होता. तसेच लवकरच दोघाचं लग्न होईल, असंही त्या म्हणाल्या होत्या.
advertisement
स्मृतीने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे सर्व फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हटवले होते. त्यामुळे त्यांचं लग्न मोडलं असल्याची चिंता चाहत्यांकडून व्यक्त केली होती. आता स्मृतीने थेट जाहीर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
स्मृतीची चाहत्यांना विनंती
पलाशसोबतचा विषय स्मृतीने संपवला असून तिने चाहत्यांनाही हा विषय संपवण्याची विनंती आपल्या पोस्टमध्ये केली आहे. स्मृती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे,"मी एक खाजगी व्यक्ती आहे. पण मला माझं लग्न रद्द झाल्याचं स्पष्ट करणं आवश्यक आहे. हा विषय मी इथेच संपवते आणि तुम्हालाही हा विषय संपवण्याची विनंती करते. कृपया आमच्या कुटुंबियांच्या गोपनियतेचा आदर करा".
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
पलाशची आई खोटं बोलली? त्या वक्तव्यानंतर 5 दिवसांतच स्मृतीने 'सासूबाईं'ना उघडं पाडलं
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement