आधी काढले पंडिताचे पैसे, गोविंदाच्या माफीनंतर बदलले सुनीताचे सूर! म्हणाली, 'मी कोणाचं नाव...'

Last Updated:

Sunita Govinda Ahuja : सुनीता आहुजा यांनी गोविंदाच्या पुजाऱ्यांवर फसवणुकीचे आरोप केले. त्यानंतर आता सुनीताने यू टर्न घेतल्याचं दिसतंय. तिने माफी तर मागितली पण ती पुढे काय म्हणाली पाहा.

News18
News18
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा तिच्या बिनधास्त स्टेटमेन्टमुळे कायम चर्चेत असते. गोविंदाचे अनेक सीक्रेट तिने बिनधास्तपणे सांगून टाकले आहेत. दरम्यान काही दिवसांआधी सुनीताच्या एका स्टेटमेन्टमुळे अभिनेता गोविंदावर हात जोडून माफी मागण्याची वेळ आली होती.  गोविंदाच्या कुटुंबातील पुजाऱ्याविरुद्ध सुनीताने कमेन्ट केली होती.  त्यानंतर गोविंदाने पंडित मुकेश शुक्ल यांची माफी मागितली. त्यानंतर आता सुनीताचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती गोविंदाची माफी तिला अजिबात आवडली नसल्याचं सागितलं आहे.
सुनीता एका पॉडकास्टमध्ये तिच्या देवावरील श्रद्धेविषयी बोलली होती. तेव्हा तिना गोविंदाला फसवणाऱ्या पंडितांवरही भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती. "कितीतरी पंडित असे आहेत जे फक्त पैशांसाठी लोकांची दिशाभूल करतात. गोविंदाही अशाच पूजा करतो."
advertisement
सुनीता पुढे म्हणाली होती, "ही पूजा करून घ्या आणि मला 2 लाख रुपये द्या. मी अनेकदा त्याला स्वतः पूजा करायला सांगते, कारण त्यांची पूजा गोविंदाला मदत करणार नाही. देव तिचं प्रार्थना स्वीकारतो जी तुम्ही स्वत: करता. अशा विधींसाठी 2 लाख काय 10 लाख रुपये दिले तरी मी विश्वास ठेवत नाही."
advertisement
आता सुनिताने नवीन व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिने तिला गोविंदाची अशा प्रकारे माफी आवडली नाही आणि ती कधीही तिच्या वक्तव्यावर माफी मागू इच्छित नाही असं म्हटंल आहे. सुनीताने तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये म्हटलंय, "मी बऱ्याचदा ऐकले आहे की मी काही अयोग्य शब्द वापरले आहेत. माझे आदरणीय पती, गोविंदा जी, जे माझे पती आहेत, त्यांनीही हात जोडून माफी मागितली जी मला अजिबात आवडली नाही. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ची ची (गोविंदा) तुम्ही कधीही कोणासमोर माझ्यासाठी भीक मागावी असे मला वाटणार नाही."
advertisement
सुनीता पुढे म्हणाली, "मी कोणाचेही नाव घेतले नाही किंवा विशेषतः कोणाबद्दल बोलले नाही. माझ्यासोबत असे काही घडले म्हणून मी बोलले. जर तुम्हाला वाईट वाटले असेल, तर मी प्रत्येक सिद्ध पीठाच्या गुरुंची आणि प्रत्येक ठिकाणच्या गुरुंची हात जोडून माफी मागू इच्छिते. मी माझ्या अनुभवाबद्दल बोलले. गोविंदा जी यांच्याकडे सध्या तीन पुजारी आहेत. त्यांना हे स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. मला खूप वाईट वाटले. गोविंदाने असे करावे असे मला कधीच वाटत नाही."
advertisement
सुनीता आहुजा यांनी अलीकडेच पारस छाब्राच्या पॉडकास्टवर फसव्या पुजाऱ्यांबद्दल बोलले. ती म्हणाली, "आमच्या घरीही असाच एक पुजारी आहे. तो गोविंदाचा पुजारी आहे. तो एक बनावट पुजारी आहे. तो नेहमीच नवीन विधी आणि पूजा सुचवत असतो आणि त्यासाठी पैसे घेत असतो. ही पूजा करून घ्या आणि मला २ लाख रुपये द्या. मी अनेकदा त्याला स्वतः पूजा करायला सांगते, कारण त्याची पूजा गोविंदाला मदत करणार नाही. अशा तथाकथित विधींसाठी मी 2 किंवा 10 लाख रुपये देण्यावर विश्वास ठेवत नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी काढले पंडिताचे पैसे, गोविंदाच्या माफीनंतर बदलले सुनीताचे सूर! म्हणाली, 'मी कोणाचं नाव...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement