भयाण शांतता, खाणेरडा वास अन् उमेश कामतने खऱ्या प्रेतासोबत केला सीन, सांगितला थरारक अनुभव

Last Updated:

Umesh Kamat : अभिनेता उमेश कामतचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात त्याने खऱ्या प्रेतासोबत एक सीन शूट केला आहे. हा सीन शूट करतानाचा थरारक अनुभव त्याने शेअर केलाय.

News18
News18
अभिनेता उमेश कामत 'ताठ कणा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. न्यूरोस्पाईन सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. ज्यात अभिनेता उमेश कामत त्यांची प्रमुख भुमिका साकारत आहे. या सिनेमात उमेशने एका खऱ्या प्रेतासोबत सीन शूट केला आहे. तो सीन शूट करतानाचा त्याचा थरारक अनुभव त्याने शेअर केलाय.
लोकमत फिल्मीशी बोलताना उमेशने सांगितलं, "आम्ही कूपर हॉस्पिटलमध्ये शूट करत होतो. त्यांनी आम्हाला एक लॅब दिली होती. आमचा असिस्टंट एकदा आला आणि म्हणाला, सर तुम्हाला डेड बॉडीसोबत शूटींग करायचं आहे बहुतेक. मी म्हटलं चल चल, असं काही नसेल. कारण आमच्या आतापर्यंतच्या प्लॅनमध्ये कुठेच नव्हतं ते. गिरीष सर इम्प्रोवाइझेशनवर खूप विश्वास ठेवतात. त्यांना त्या वेळेला जे वाटतं ते तुमच्याकडून काढून घेतात. अनेकदा हा सिनेमा तयार होता होता आणखी बेटर होत गेला असं मला वाटतं. त्यांची ती प्रोसेस आहे.
advertisement
ते ऐकल्यानंतर माझ्या मनात धाकधूक सुरू झाली होती. तरी मला वाटतं होतं की कोणीतरी माझी मस्करी करत आहे, कोणीतरी माझी खेचतय. नंतर दुसरा असिस्टंट आला तो म्हणाला, सर तिथे तयार होतंय, तुम्हाला खरंच जायचंय. मग माझी धडधड सुरू झाली. काय तरी गडबड आहे, मी आता हा सीन कसा करणार.
advertisement
उमेश पुढे म्हणाला, "गिरीश सर आले, म्हणाले, हो आपल्याला परमिशन मिळाली आहे आधी परमिशन मिळत नव्हती. त्याचे जरा प्रोब्लेम्स होते त्यामुळे आपण करणार नव्हतो. पण आता योग्य वेळेला आपल्याला परमिशन मिळाली आहे आणि आपण तो सीन शूट करतोय. आपण एक सीन केला आहे. खरी डेड बॉडी आहे. तू तिथे जाऊन मी सांगतो तेवढं कर. आपल्याला तो शॉट मिळाला तर खूप चांगलं होईल. हे म्हटल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी हा सीन कसा करणार?"
advertisement
"तो सीन शूट करायचा आहे म्हटल्यावर प्रत्येक डिपार्टमेन्ट त्याचं त्याचं काम करायला तिथे जाऊन येत होतं. ते बाहेर येत होते तेव्हा डोक धरूनच येत होते, कोणाला मळमळत होतं कारण तो वास असा होता की तुमचं डोकं धरतं. त्याने मला जास्त भीती वाटायला लागली. मी म्हटलं मी यांना सांगणार आहे की मला नाही जमणार नाही. पण सर मला कॉन्फिडन्स देत होते. काळजी करू नको, होईल."
advertisement
सीन शूट करताना नेमकं काय झालं हे सांगताना उमेश म्हणाला, "आम्ही त्या भागात जेव्हा गेलो तेव्हा तो वास मला यायला लागला. मी म्हटलं, बाप रे. ते डेड बॉडी कशी दिसतेय मला काही माहिती नव्हतं, पण आजू बाजूचे लोक जे रिअँक्ट होत होते त्यामुळे मला जास्त भीती वाटत होती. त्या रूममध्ये बाकी कोणी येणार नव्हतं, मला एकट्यालाच जायचं होतं. सरांनी मला सांगितलं की, ती रुम आहे. रूमच्या बाहेर ट्रॉली आहे. ट्रॉली अशी चालेल, तू जा आतमध्ये, एक्शन म्हटल्यावर ही ही एक्शन कर. तो शॉट घेतला की मी कट म्हणेन की तू लगेच बाहेर निघून ये."
advertisement
"कसं तरी धीर एकवटला, कारण मी कोणाची भूमिका करतोय, आणि हे सगलं जाऊन मी तिथे केलं तर त्या सिनेमाला काही अर्थच नाहीये. जे होईल ते होईल, हे सगळे आहेत बाहेर, मी देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं ओके आपण करूया. एक असिस्टंट होता, एक डिओपी होता, मला सांगितलं, मी आधी डोळे बंद केले आणि चला आता होऊदेत काय व्हायचं ते, आणि गेलो. मी बाहेर आला आणि मला युरेका सारखं वाटलं. माझ्यातली भीती गेली आणि माझ्यातला धीर वाढला", असंही उमेशनं सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
भयाण शांतता, खाणेरडा वास अन् उमेश कामतने खऱ्या प्रेतासोबत केला सीन, सांगितला थरारक अनुभव
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement