बॉलिवूडवर शोककळा! शाहिद कपूरच्या ऑनस्क्रिन आजीचं निधन, अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृतीबाबत चाहते चिंता व्यक्त करत असताना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्री शाहिद कपूरची ऑनस्क्रिन आजी म्हणून शेवटची प्रेक्षकांसमोर आली होती.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र 12 दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सगळ्यांचा चिंता लागून राहिलेली असतानाच बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिग्गज अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री कामिनी कौशल यांनी हिंदी सिनेमाचा एक काळ गाजवला. इंडस्ट्रीतील सन्मानित आणि लाडक्या अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सिने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.
अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1927 साली पाकिस्तानच्या लाहोर येथे झाला. 1946 साली त्यांनी ' नीचा नगर' या ब्लॅक अँड व्हाइट सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. दिलीप कुमार, राज कपूर सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं. शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेस, 2019 मध्ये आलेल्या कबीर सिंह आणि 2022 साली आलेल्या लाल सिंह चड्ढा सिनेमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. कबीर सिंह सिनेमात त्यांनी शाहिद कपूरच्या आजीची भूमिका साकारली होती.
advertisement
( बातमी अपडेट होत आहे. )
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 1:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बॉलिवूडवर शोककळा! शाहिद कपूरच्या ऑनस्क्रिन आजीचं निधन, अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड


