सकाळी रिकाम्या पोटी ताम्रजल प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? अनेकांना याचे 'हे' फायदे माहितच नाही

Last Updated:

सकाळी रिकाम्या पोटी ताम्रजल पिल्याने शरीरात कोणते बदल जाणवतात? चला जाणून घेऊ

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतीय घरांमध्ये तांब्याचा वापर हा फक्त परंपरेचा भाग नाही, तर आरोग्याचा खजिना आहे असं मानलं जातं. आजही अनेक गावांमध्ये लोक तांब्याच्या भांड्यातील पाणीच पितात. आपल्या आजोबा-आज्जीच्या काळापासून “तांब्याचं पाणी प्या, तब्येत चांगली राहते” ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत.
आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत, सर्वत्र तांब्याच्या गुणांना मान्यता आहे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी (किमान 8 तास किंवा रात्रभर ठेवलं जातं, ज्यामळे काही सूक्ष्म खनिजे त्यापाण्यात सामावले जातात. असं तयार झालेलं पाणी ‘ताम्रजल’ म्हणून ओळखलं जातं. हे पाणी अँटीबॅक्टेरिअल, अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांनी समृद्ध असतं आणि शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं.
advertisement
सकाळी रिकाम्या पोटी ताम्रजल पिल्याने शरीरात कोणते बदल जाणवतात? चला जाणून घेऊ
१) पचनक्रिया सुधारते
तांब्याच्या पाण्यात असे गुण असतात जे पोटातील समस्या कमी करण्यात मदत करतात. गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता या तिन्ही समस्या ताम्रजलामुळे कमी होऊ शकतात. तांबा पचनतंत्राला डिटॉक्स करतो, ज्यामुळे पचनशक्ती अधिक सक्षम होते.
रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या पचन सुधारताना जाणवेल.
advertisement
२) रोगप्रतिकारशक्ती वाढते
तांब्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-वायरल दोन्ही गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराची इम्युनिटी नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते. नियमितपणे तांब्याचे पाणी पिणारे लोक संक्रमणांना तुलनेने कमी बळी पडतात.
३) वजन कमी करण्यात मदत
तांबा शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो. मेटाबॉलिझम जितका चांगला, तितका फॅट बर्न होण्याचा वेग जास्त. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल तर तांब्याच्या पाण्याची सवय फायदेशीर ठरते.
advertisement
४) त्वचा तरुण आणि चमकदार ठेवतो
तांबा मेलानिन तयार होण्यास मदत करतो, तसेच शक्तिशाली अँटीऑक्सिडंटही आहे. त्यामुळे त्वचेवरचा निस्तेजपणा कमी होतो,
रिंकल्स लवकर येत नाहीत, त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो देते, एंटी-एजिंग साठी ताम्रजल एक नैसर्गिक उपाय मानला जातो.
५) हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यात मदत
तांबा कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी करण्यात सहाय्यक असतो. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयाचे कार्य व्यवस्थित राहते. हाय BP असणाऱ्यांसाठीही हे फायदेशीर मानले जाते.
advertisement
६) रक्तातील हीमोग्लोबिन वाढवण्यास मदत
तांबा शरीराला आयर्न शोषण्यास मदत करतो. आयर्न शोषण जितकं चांगलं, तितका हीमोग्लोबिन वाढतो.
म्हणूनच अॅनिमिया असणाऱ्यांना तांब्याच्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सकाळी रिकाम्या पोटी ताम्रजल प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? अनेकांना याचे 'हे' फायदे माहितच नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement