Success Story : नोकरी नव्हे तर व्यवसाय निवडला, आपल्या चिवडा स्टॉलला दिलं डिग्रीचच नाव, तरुणाची अजब कहाणी...

Last Updated:

वर्ध्यातील तरुणाने चक्क डिग्रीचच नाव चिवड्याच्या स्टॉलला दिलं आहे. त्यामुळे ग्राहक देखील स्टॉलकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : आजकालच्या तरुणांकडे कल्पनांची कमी नाही. आपलं काम उत्कृष्टरित्या करण्यासाठी नवनवीन संकल्पनांची जोड देत असतात. अशाच प्रकारे वर्ध्यातील बी.कॉम चिवडेवाला सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. आपल्या चिवड्याच्या स्टॉलचे नाव काहीतरी नवीन असावं असं गौरव नांदने याला वाटत होतं. अशातच त्याची डिग्री पूर्ण झाली त्याने बी.कॉम पूर्ण केलं आणि चक्क डिग्रीचच नाव या चिवड्याच्या स्टॉलला दिलं आहे. त्यामुळे ग्राहक देखील स्टॉलकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
advertisement
म्हणून व्यवसायाला प्राधान्य 
गौरव दिलीप राव नांदने असं या तरुणाचं पूर्ण नाव आहे. अवघ्या 22 वर्षांच्या वयात तो बी.कॉम चिवड्याचे नाव मोठं करतोय. याबद्दल माहिती देताना गौरव याने सांगितले की, माझं बी.कॉम झालं आहे. जर मी खाजगी नोकरी केली असती तर मिळणाऱ्या पगारात मी समाधानी नसतो, हे मला माहीत होते. त्यामुळे नोकरीतून मिळणाऱ्या पगरापेक्षा मी माझ्या व्यवसायातून जास्त मिळकत कमावतो आहे. आणि माझ्या व्यवसायाचा मी स्वतः मालक असावा असं मला वाटत होतं. त्यामुळे मी चिवड्याच्या व्यवसायाला प्राधान्य देत बी.कॉम हे नाव ठेवत पुढे नेत आहे. बी.कॉम चीवडेवाला हे नाव मी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलं असल्याचंही गौरव सांगतो. आणि ग्राहकांची देखील चिवड्याला पसंती दिसून येते.
advertisement
दुपारी 2 ते रात्रीपर्यंत स्टॉल सुरू
सकाळी आपल्या स्टॉलला स्वच्छ करणे, चिवड्याला लागणारे सर्व साहित्य तयार करणे, कांदा, मुळा, लिंबू, कोथिंबीर या वस्तू चिरून तयार ठेवणे अशी पूर्वतयारी तो करतो. त्याचे आईवडील देखील बाजाराच्या ठिकाणी चिवड्याचाच व्यवसाय करतात. दुपारी 2 वाजता गौरव आपला स्टॉल लावतो आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत स्टॉल सुरू असतो. या कालावधीत तो चांगली मिळकत कमवितो.
advertisement
महिन्याला 30 -40 हजारांचा फायदा 
खाजगी नोकरी करण्यापेक्षा वडिलोपार्जित व्यवसायातूनच चांगली मिळकत तो कमवत आहे. त्यामुळे नोकरीचा मार्ग सोडून त्यांनी व्यवसायालाच पुढे नेण्याचं ठरवलं. या चिवड्याचे व्यवसायातून गौरवला दिवसाला 2 ते 3 हजार रुपयांची मिळकत होत असून महिन्याला अंदाजे 30-40 हजार फायदा होत असल्याचं तो सांगतोय.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Success Story : नोकरी नव्हे तर व्यवसाय निवडला, आपल्या चिवडा स्टॉलला दिलं डिग्रीचच नाव, तरुणाची अजब कहाणी...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement