advertisement

Psoriasis : त्वचेच्या समस्यांचा मानसिक आरोग्याशी संबंध, त्वचेच्या आजारांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही होते कमी

Last Updated:

त्वचेशी संबंधित आजार केवळ शरीरापुरते मर्यादित नाहीत तर त्यांचा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधनानुसार, एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या चारपैकी एक रुग्ण मानसिक आजारानं ग्रस्त असल्याचं आढळून आलं.

News18
News18
मुंबई : आजार मग तो कोणताही असो थोड्या प्रमाणात मनावर परिणाम करणारा ठरु शकतो. आजार जर दीर्घ स्वरुपाचा असेल तर रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो.
त्वचेशी संबंधित आजार केवळ शरीरापुरते मर्यादित नाहीत तर त्यांचा मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या संशोधनानुसार, एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या चारपैकी एक रुग्ण मानसिक आजारानं ग्रस्त असल्याचं आढळून आलं.
रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम - यामुळे केवळ शारीरिकच नाही तर तीव्र मानसिक ताण, समाजात वावरताना बुजरेपणा येऊ शकतो. सतत खाज सुटणं आणि अस्वस्थ वाटणं यामुळे त्वचेच्या रुग्णाचा ताण वाढतो, ज्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. या अभ्यासात 466 त्वचा रुग्णांचा समावेश होता. हे संशोधन रशियन आंतरराष्ट्रीय जर्नल कन्सोर्टियम सायकियाट्रिकममध्ये प्रकाशित झालं आहे. या रुग्णांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली असता, आश्चर्यकारक निकाल समोर आले. पंचवीस टक्क्यांहून अधिक, म्हणजेच 117 रुग्ण चिंता विकारानं ग्रासलेले होते.
advertisement
सायकियाट्रिक जीनोमिक्स कन्सोर्टियम म्हणजेच (पीजीसी).या आंतरराष्ट्रीय संशोधन गटात अडतीसहून अधिक देशांमधील आठशेहून अधिक शास्त्रज्ञ आहेत. स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर आणि नैराश्यासारख्या आजारांसाठी मोठ्या प्रमाणात डेटाचं विश्लेषण करून निदान आणि उपचार सुधारण्यासाठी हा गट कार्य करतो.
advertisement
मानसिक आरोग्यावरही परिणाम - सोरायसिस, त्वचा आणि मज्जासंस्था हे एकमेकांचे प्रतिबिंब मानले जातात. म्हणूनच एक्झिमा, पुरळ आणि त्वचारोग यासारख्या त्वचेच्या समस्यांचा रुग्णांच्या केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील परिणाम करतात.
चेहऱ्यावर किंवा शरीराच्या दृश्यमान भागांवर डाग पडल्यानं अनेक रुग्णांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि ते सामाजिक संपर्क टाळण्याचा प्रयत्न करतात. दीर्घकाळापर्यंत ताणतणावामुळे शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेची सूज आणि ऍलर्जीचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे, त्वचेच्या समस्या असलेल्या रुग्णांमधे चिंता, न्यूनगंड आणि नैराश्य होण्याची शक्यता तीन ते चार पट जास्त असते.
advertisement
खरं तर, मानसिक विकारांमुळे, शिंगल्स पुन्हा येऊ शकतात किंवा कधीही पूर्णपणे बरे होत नाहीत आणि कालांतरानं हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो.
केवळ मलम आणि गोळ्यांनी त्वचेच्या आजारांवर संपूर्ण उपचार शक्य नाहीत. अशा रुग्णांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. यामधे रुग्णांना केवळ अँटी-फंगल थेरपीच नाही तर मानसिक मदतीची देखील आवश्यकता आहे का हे निश्चित करण्यासाठी नियमित मानसिक आरोग्य तपासणीही करावी असं मत संशोधकांनी व्यक्त केलं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Psoriasis : त्वचेच्या समस्यांचा मानसिक आरोग्याशी संबंध, त्वचेच्या आजारांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही होते कमी
Next Article
Tips And Tricks : फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
फेव्हिक्विकने बोटं चिकटली असतील तर घाबरू नका, 'या' ट्रिकने क्षणांत वेगळी होतील
View All
advertisement