Winter special Kadha : सर्दी आणि खोकला मुळापासून संपेल! स्वयंपाकघरातील 'या' वस्तूंनी बनवा खास काढा..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Ayurvedic home remedy for cold and cough : या हंगामात तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करून सुरक्षित आणि निरोगी राहू शकता. हिवाळ्यात नियमितपणे काढा सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतोच शिवाय शरीर नैसर्गिकरित्या मजबूत देखील होते.
मुंबई : हिवाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार पसरतात. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक असते. या हंगामात तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करून सुरक्षित आणि निरोगी राहू शकता. हिवाळ्यात नियमितपणे काढा सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतोच शिवाय शरीर नैसर्गिकरित्या मजबूत देखील होते. येथे आम्ही तुम्हाला एक प्रभावी काढा बनवण्याचे साहित्य आणि विधी सांगत आहोत.
हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या समस्या सामान्य होतात. बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि लोक लवकर आजारी पडू लागतात. वारंवार डॉक्टरांकडे जाणे आणि औषधांवर खर्च करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशा परिस्थितीत आयुर्वेदात सांगितलेले घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात.
शरीर आतून गरम ठेवा
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संतोष मौर्य सांगतात की, हिवाळ्यात शरीर आतून गरम ठेवले तर सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांपासून बचाव करता येतो. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या सुंठ, हळद, आले, तुळस आणि काळी मिरी यांसारख्या औषधी वस्तूंपासून तयार केलेला काढा या हंगामात खूप फायदेशीर ठरतो.
advertisement
काढा घरी कसा बनवायचा?
काढा बनवण्यासाठी एका कपात पाणी घेऊन त्यात सर्व सामग्री मिसळा आणि पाणी अर्धे होईपर्यंत उकळा. त्यानंतर गाळून तो कोमट असताना प्या. डॉ. मौर्य यांच्या मते, या काढ्याचे सकाळ-संध्याकाळ तीन दिवस सलग सेवन केल्यास सर्दी-खोकल्यात खूप आराम मिळतो. गरज वाटल्यास तो सात दिवसांपर्यंतही घेता येऊ शकतो. हा काढा शरीर गरम ठेवतो आणि घसा खवखवणे, कफ आणि ताप यांसारख्या समस्या दूर करतो.
advertisement
त्रिकटू चूर्ण आणि गुळवेलाचा फायदा
डॉ. मौर्य यांनी सांगितले की, याशिवाय त्रिकटू चूर्ण आणि गुळवेल चूर्ण देखील थंडीत खूप लाभदायी आहेत. त्रिकटू चूर्ण मधासोबत किंवा तुळस आणि आल्यासोबत कोमट करून घेतले जाऊ शकते. तसचेच गुळवेलाचे चूर्ण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संसर्गापासून बचाव करण्यास मदत करते. या दोन्ही औषधी आयुर्वेदिक दुकानांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये सहज उपलब्ध आहेत.
advertisement
थंडीत 'या' गोष्टींचीही काळजी घ्या
डॉ. मौर्य यांनी सांगितले की, थंडीत हे घरगुती उपाय अवलंबून लोक औषधांवरील अवलंबित्व कमी करू शकतात. नियमितपणे काढ्याचे सेवन केल्याने केवळ सर्दी-खोकल्यातून आराम मिळतो आणि शरीरही नैसर्गिकरित्या मजबूत होते. थंडीच्या दिवसात कोमट पाणी प्या, हलका आणि पौष्टिक आहार घ्या आणि सकाळचे ऊन अवश्य घ्या असा सल्लाही त्यांनी दिला आहे. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे आहारात कोणताही मोठा बदल करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter special Kadha : सर्दी आणि खोकला मुळापासून संपेल! स्वयंपाकघरातील 'या' वस्तूंनी बनवा खास काढा..


