Nashik: 45 वर्षीय महिलेनं तब्बल 14 बाळांना दिला होता जन्म, 6 मुलांना विकलं; नाशिकमधील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
महिलेनं घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशांसाठी 14 पैकी आपली 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक: नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेनं तब्बल 14 अपत्यांना जन्म दिला. मात्र या महिलेनं घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशांसाठी 14 पैकी आपली 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चुबाई विष्णू हांडोगे (वय 45) असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं 10 ऑक्टोबर 2025 ला एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. मात्र या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर तिनं आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलंय.
advertisement
या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या पाड्यावरील बच्चुबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहचली, मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झाली. पती-पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही याच घरात आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतलीय. तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. अवघ्या दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलंय.
advertisement
भावाला मुलगा विकला
एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्यान विकलं, अशी माहिती दिली तर सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
१० हजारांत विकले बाळ
पैशासाठी मुलांची विक्री केल्याच्या या घटनेचा शोध घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकी देवगावचा बाराड्याची वाडी या पाड्यावरील बच्चुबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहोचली तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. "आमच्या आई-वडिलांनी दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकलं एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्याने विकलं अशी माहिती दिली तर सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
advertisement
न्यूज18 लोकमतचे सवाल
महिलेवर मुलांची विक्री करण्याची वेळ का आली?
अवघ्या 10 हजारांसाठी का केली 3 दिवसाच्या मुलाची विक्री?
महिलेनं 6 मुलांना विकलं हे कोणालाही कसं कळलं नाही?
पोलीस विकलेल्या चिमुरड्यांचा शोध घेणार का?
मुलांना विकत घेणाऱ्यांवर कारवाई होणार का?
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 09, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: 45 वर्षीय महिलेनं तब्बल 14 बाळांना दिला होता जन्म, 6 मुलांना विकलं; नाशिकमधील घटना








