ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला, कामासाठी आले मालकाला चुना लावून गेले, अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अहिल्यानगरमधील १ कोटींच्या सोनं चोरीप्रकरणी सोमेन शांती बेरा, अनिमेश मनोरंजन दोलुई, सोमनाथ जगन्नाथ सामंता यांना पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी अटक केली.
सोनं चोरीची अजब घटना समोर आली आहे. सोनं व्यापाऱ्याकडून तब्बल 1 कोटींहून अधिक रकमेचं सोनं घेऊन टोळी पसार झाली. या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अहिल्यानगरमधील चोरीच्या घटनेचे पश्चिम बंगालपर्यंत धागेदोरे सापडले. चोर पश्चिम बंगालमध्ये पळून गेल्याने त्यांना तिथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहिल्यानगरमध्ये एका सोने व्यापाऱ्याकडून तब्बल १ कोटींहून अधिक रकमेचे सोने घेऊन चोर पसार झाले होते.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा केला त्यावेळी दागिने आणि पैसे घेऊन चोर फरार झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला. सोनं घेऊन फरार झालेल्या कारागिरांच्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आलं. या टोळीतील चार जणांना पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांनी चोरट्यांकडून ५१ लाख १२ हजार ७९५ रुपये किमतीचे सोनं ताब्यात घेतलं आहे.
advertisement
उरलेलं सोनं आणि रोख रक्कम चोरांनी काय केली याची चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या अटकेची माहिती दिली. "शहरात मोठी चोरी करून हे कारागीर आपल्या मूळ गावी पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा मागोवा घेतला आणि पश्चिम बंगालमध्ये धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले."
advertisement
पोलीस निरीक्षक कबाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये खालील चौघांचा समावेश आहे. यातले तीन जण हुगळी तर एक हावरा इथला असल्याची माहिती मिळाली आहे,. सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक, अनिमेश मनोरंजन दोलुई, सोमनाथ जगन्नाथ सामंता अशी आरोपींची नावं आहेत. अहिल्यानगर पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील सोने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला, कामासाठी आले मालकाला चुना लावून गेले, अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घटना


