कार्ड एटीएममध्ये अडकलं…वडील-मुलाने तसंच ठेवून दिलं, घरी पोहोचेपर्यंत 60,000 गायब, ऐरोलीत नेमकं काय घडलं?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ऐरोली सेक्टर-३मधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये कार्ड अडकल्याने एका कुटुंबाच्या खात्यातून अज्ञात भामट्याने ५९२९५ रुपयांची फसवणूक केली, पोलिस तपास सुरू.
नवी मुंबई: रोजच्या धावपळीत बँकेचे महत्त्वाचे काम पटकन उरकून घ्यावे, या विचारात असलेल्या एका कुटुंबाला त्यांच्या एका लहानशा चुकीमुळे मोठा फटका बसला आहे. ऐरोली सेक्टर-३ मध्ये एका एटीएममध्ये कार्ड अडकल्यामुळे एका अज्ञात भामट्याने अवघ्या काही वेळातच वडील आणि मुलाच्या खात्यातून तब्बल ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रसंग केवळ फसवणुकीचा नाही, तर निष्काळजीपणा आणि आधुनिक गुन्हेगारीचा सर्वसामान्य नागरिकांना कसा फटका बसतो, याची जाणीव करून देणारा आहे.
हजार रुपये काढले, पण कार्ड अडकले
घडलेली घटना अशी आहे की, तक्रारदार व्यक्ती आपल्या मुलासोबत ऐरोली येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी कार्ड मशीनमध्ये टाकून १,००० रुपये काढलेही. परंतु, त्यानंतर मात्र त्यांचे कार्ड एटीएम मशीनमध्येच अडकले. वडील आणि मुलाने खूप प्रयत्न केले, कार्ड बाहेर काढण्यासाठी हातपाय मारले, पण कार्ड काही बाहेर आले नाही. एटीएममधून बाहेर पडायला उशीर होत असल्यामुळे आणि कार्ड बाहेर काढता येत नसल्यामुळे त्यांनी ते तसेच मशीनमध्ये सोडले आणि 'नंतर बघू' या विचारात घरी निघून गेले.
advertisement
घरी पोहोचताच आला मेसेज आणि धक्का
वडील आणि मुलगा घरी पोहोचले नाहीत तोच त्यांच्या मोबाइलवर सतत पैसे डेबिट झाल्याचे मेसेज येऊ लागले. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच, त्यांना मोठा धक्का बसला. एटीएममध्ये त्यांनी सोडलेले कार्ड एका अज्ञात भामट्याने बाहेर काढले आणि लगेच त्या कार्डचा वापर करून पैसे काढायला सुरुवात केली. एवढेच नाही, तर त्या कार्डवरून त्याने मोठी खरेदीही केली. अवघ्या काही तासांतच त्यांच्या बँक खात्यातून एकूण ५९,२९५ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
advertisement
सुरक्षिततेचा धडा आणि पोलिसांचा तपास
view commentsही धक्कादायक घटना ऐरोलीमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे एका सामान्य कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. एटीएममध्ये कार्ड अडकल्यास ते तिथेच सोडून जाणे किती धोकादायक ठरू शकते, याचा अनुभव त्यांना आला आहे. घटनेची तक्रार ऐरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तात्काळ तपास सुरू केला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस एटीएम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून या भामट्याला लवकर पकडता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 2:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कार्ड एटीएममध्ये अडकलं…वडील-मुलाने तसंच ठेवून दिलं, घरी पोहोचेपर्यंत 60,000 गायब, ऐरोलीत नेमकं काय घडलं?


