सिकंदर शेखने पंजाब हरियाणाच्या पैलवानांना आस्मान दाखवलंय, त्यांच्याकडून अडकविण्याचे षडयंत्र? अजितदादांच्या नेत्याला संशय

Last Updated:

मराठी पैलवानाविरोधात पंजाब आणि हरियाणा येथील पैलवानांकडून रचलेले षडयंत्र असू शकते, असे उमेश पाटील म्हणाले.

सिकंदर शेख-उमेश पाटील
सिकंदर शेख-उमेश पाटील
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधील पैलवानांकडून गुंतवण्याचे षडयंत्र सुरू आहे का? असा संशय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी पिस्तूल तस्करी प्रकरणात अटक केली आहे.
पंजाब आणि हरियाणा येथील पैलवानांना सिकंदर शेख याने चितपट केले आहे. त्यामुळे त्या रागातून त्यांनीच सिकंदरविरोधात असे षडयंत्र रचले आहे का? या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे
उमेश पाटील म्हणाले.

सिकंदरला १४ थार गाड्या आणि नऊ ते दहा बुलेट मिळाल्या, तो कशाला पिस्तूल तस्करी करेन?

सिकंदर हा वर्षातून चारशे ते पाचशे कुस्त्या खेळायचा. त्यातून त्याला अंदाजे पाच कोटी रूपये मिळायचे. सिकंदरला १४ थार गाड्या आणि नऊ ते दहा बुलेट मिळाल्या होत्या. एवढा इन्कम असताना शस्त्रास्त्र तस्करीत तोच सहभागी असे वाटत नाही. मराठी पैलवानाविरोधात पंजाब हरियाणा येथील पैलवानांकडून रचलेले षडयंत्र असू शकते, असे उमेश पाटील म्हणाले.
advertisement

...त्याने फक्त पार्सल घेतलं

मित्रांच्या सांगण्यावरून सिकंदर शेख याने बंदूक असलेले पार्सल घेतले होते. सिकंदरला त्याची कल्पना नव्हती, असा दावाही उमेश पाटील हे सिकंदरची बाजू घेताना म्हणाले. सिकंदरची

पोलिसांची कारवाई, कुटुंबियांनी आरोप फेटाळले

पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सिकंदरच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळून लावले असून सिंकदर निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
advertisement

देशातला नावाजलेला मल्ल, सिकंदर शेख याची ओळख

अतिशय गरिबीतून वरती आलेला सिकंदर शेख हा नावाजलेला मल्ल म्हणून गणला जाऊ लागला. देशभरातील मानाच्या कुस्त्यांच्या मैदानात मोठमोठ्या मल्लांना चितपट करत सिंकदरने नाव कमावले. २०२४ साली त्याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. पाठोपाठ रुस्तम ए हिंद केसरीची गदाही त्याने उंचावली. अल्पावधीत सिकंदर शेख कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिकंदर शेखने पंजाब हरियाणाच्या पैलवानांना आस्मान दाखवलंय, त्यांच्याकडून अडकविण्याचे षडयंत्र? अजितदादांच्या नेत्याला संशय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement