Ajit Pawar: अजित पवारांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानियांच्या मागणीला दादांचं उत्तर, एका वाक्यात विषय संपवला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अंजली दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी कशी होणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.. अंजली दमानियांच्या मागणीला दादांनी पुण्यात उत्तर दिले आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
advertisement
आगामी निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करणार यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आज मला पुण्यातले स्थानिक पदाधिकारी, दोन्ही शहराध्यक्ष सगळे माजी नगरसेवक आणि आमदार भेटले पण भेटले. त्यांना मी सांगितलं आहे की, तुम्ही चाचणी करा मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्याबद्दल निर्णय घेऊ... अजून महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे काय काय होतं आणि कसं कसं होतं ते पहावं लागेल. निवडणुका होऊन खूप दिवस झाले आहेत . आज आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये आमचं काम सुरू आहे. पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत कुठल्या कुठल्या शहरात काय काय घडतं हे साधारण लवकर समजेल अंदाज येईल. अंदाज आला की पुढच्या गोष्टी ठरवता येतील.माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं नाही. कार्यकर्ते त्यांच्या भावना मांडत असतात, मी सगळ्या भागातल्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चाचणी करा आणि ठरवा... आम्ही पहिली निवडणूक लढत नाहीत आम्ही लोकांनी अशा कित्येक निवडणुका लढल्या आहेत हे आम्हाला नवीन नाहीत आमच्यामध्ये एकोपा राहून निवडणुका लढू... सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि युतीबाबत काय तो योग्य निर्णय घेऊ... आम्ही आमच्या पक्षाचे बघू तुम्ही काळजी नका करू
advertisement
अंजली दमानियांच्या मागणीवर अजित पवारांचे एका वाक्यात उत्तर
पुणे जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी यासाठी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानिया यांच्या मागणीवर अजित पवार म्हणाले, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मला योग्य वाटेल ते मी करेल...
पुण्यातील अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीवर अजित पवार काय म्हणाले?
advertisement
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर बोलताना अजित पवार म्हणाले, अल्पवयीन मुलं गुन्हेगारीत येत आहेत. 14 वर्षाखालील 15 वर्षाखालील मुलं गुन्हे करत आहेत. अल्पवयीन मुलाचे वय 18 वर्ष आहे ते काढून कमी करावं हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देत आहोत. काही चुकीचे लोक त्यांचा हेतू साधण्याकरता अल्पवयीन मुलांना सामावून घेत आहेत . कारण ते अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल करायला अडचणी येतातय
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: अजित पवारांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानियांच्या मागणीला दादांचं उत्तर, एका वाक्यात विषय संपवला


