Anant Garje: गौरीचा मृत्यू झाल्याचे कळताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं, CCTV आला समोर

Last Updated:

डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली.

News18
News18
मुंबई : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पत्नी गौरी गर्जेच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलीय.वरळीतील राहत्या घरी गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गौरीची आत्महत्या नाही हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.दरम्यान आज कोर्टात झालेल्या सुनावणीत मोठी अपडेट समोर येत आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच अनंतने स्वत:ला देखील इजा करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार असून पोलीस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत. अनंत गर्जेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याची पोलिसांचे म्हणणे आहे. अनंत गौरीला घेऊन पोतदार रुग्णालयात गेला तेव्हा ती मृत झाल्याचे कळताच त्याने स्वत:चे डोके भिंतीवर आपटण्याचाही प्रयत्न केला होता. पोतदार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
advertisement

अनंत गर्जेच्या वकिलांनी काय सांगितले? 

अनंत गर्जेच्या वकिलांनी दिलेल्य माहितीनुसार, अनंताच्या शरीरावर जखमा होत्या, मी त्याच्याकडून माहिती घेतली. यातल्या काही जखमा जुन्या, काही त्या दिवशी झाल्या. 5.12 ला वरळीच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. वरळीच्या ऑफिसला गेले 5.22 ला, वरळीच्या ऑफिसून 5.32 ला विमानतळाच्या दिशेने निघाले, त्यांना गौरीचा फोन आला. घरी परत वळाले, घरी जाऊन दरवाजा वाजवला, आवाज ऐकून 2 बायका आल्या. गर्जे रेफ्युजी  एरियातून घरात शिरला आणि गौरीला उतरवत पोद्दारला घेऊन गेला, त्यानंतर तिथे कळलं की गौरी गेली त्यामुळे त्यांनी स्वतःला मारून घेतलं त्याच्या जखमा आहेत, हे सर्व CCTV फुटेज पोलिसांकडे आहे.
advertisement

अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

तसेच, पोलिसांनी अनंत गर्जेने आपल्या घराच्या खिडकीला ज्या व्यक्तिकडून जाळ्या बसवल्या त्याचाही जबाब नोंदवला आहे. पोलिसानी जाळ्या बसवणाऱ्या व्यक्तीलाच जाळीतून आतमध्ये प्रवेश करता येतो का याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगितले आणि चित्रीकरण केलेले आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, लवकरच जामिनाला अर्ज करु ,असे देखील अनंत गर्जेच्या वकिलांनी सांगितले आहे. तसेच पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब घेतल्याची माहिती दिली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anant Garje: गौरीचा मृत्यू झाल्याचे कळताच अनंतने स्वत: भिंतीवर डोकं आपटून घेतलं, CCTV आला समोर
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement