लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषध वापरतायत? अन्यथा होऊ शकतो 'हा' त्रास
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
आज कालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे वजन वाढीचे प्रमाण वाढत चालले आहे. वजन वाढायला लागलं तर कमी करण्यासाठी काही जण औषधांचा वापर करतात पण याच औषधांमुळे रिॲक्शन देखील होऊ शकतात.
सोलापूर: आज कालच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे वजन वाढीचे प्रमाण वाढत चालले आहे. वजन वाढायला लागलं तर कमी करण्यासाठी काही जण औषधांचा वापर करतात पण याच औषधांमुळे रिॲक्शन देखील होऊ शकतात हे आपल्याला माहित आहे का ? या संदर्भात अधिक माहिती डॉक्टर अमय पुरंदरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर शहरातील बालाजी सरोवर येथे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अकलूज आणि सोलापूर यांच्यावतीने क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ मुंबई येथील डॉ. अमय पुरंदरे यांनी बाजारामध्ये आलेल्या लठ्ठपणाच्या औषधांवर व्याख्यान दिले. त्या औषधांचा कसा वापर करायचा आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो? यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम आणि डायटिंगमुळे फक्त पाच टक्के वजन कमी होतं.
advertisement
जर आपल्याला अजून वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला शस्त्रक्रियाद्वारे देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. पण शस्त्रक्रिया केल्यामुळे दुष्परिणाम सुद्धा होण्याची शक्यता असते. या दोघांमध्ये असलेले पर्याय मार्ग म्हणजे बाजारामध्ये आलेले नवीन इंजेक्शन आणि औषधं हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आले आहेत. पण याचा वापर करत असताना दुष्परिणाम देखील शरीरावर होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी औषधे किंवा इंजेक्शन वापरत असाल तर हे औषध किंवा इंजेक्शन सर्वांसाठी नाही आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या.
advertisement
कुठलेही औषध असो त्याला साईड इफेक्ट असतातच. तसेच या औषधांचे सुद्धा साईड इफेक्ट्स मानवी शरीरावर होतात. ते म्हणजे गॅस्ट्रोएटिस, ॲसिडिटी हे कॉमन साईड इफेक्ट आहे. म्हणून लठ्ठपणाचे औषध वापरत असताना कमी डोस पासून याची सुरुवात करावी आणि हळूहळू तो डोस वाढवत जावा. पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्यांचा बीएमआय 30 हून जास्त आहे, लठ्ठपणाचा प्रमाण जास्त आहे अशा पेशंटने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लठ्ठपणाच्या औषधे किंवा इंजेक्शन वापरावे. याचा गैरउपयोग करू नये, नाहीतर अननसेसरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, अशी माहिती डॉक्टर अमय पुरंदरे यांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 7:35 PM IST

<
title=लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषध वापरत असाल तर सावधान... अन्यथा होऊ शकतो हा त्रास