Beed : तुमची मुलगी मला द्या...केजच्या शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण, कुऱ्हाडीने केले सपासप वार

Last Updated:

शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले आहे.

Kej Police Station
Kej Police Station
बीड: बीडमध्ये सध्या चालंलय काय? असा प्रश्न सतत पडत आहे, असा प्रश्न सध्या पडला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे गुन्हेगारीच्या घटनांमुळे निघत आहेत. विशेषतः बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्याच्या घटना ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झाला आहे का ? असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जातो आहे. जेव्हा कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक होते, गुंड व माफियांचे राज्य सुरू तेव्हा बिहारसदृष्य परिस्थिती झालीय, असे म्हटले जाते. माजलगावातील खुनाच्या घटना ताज्या असताना केज तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तुमची मुलगी मला द्या... असे म्हणत शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गावगुंडाने केली जबर मारहाण

बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तुमची मुलगी मला द्या... असे म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आले आणि हा अपघात दर्शविण्यात आला. बाजीराव डोईफोडे असे जखमी शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या प्रकरणात पीडित कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचं म्हटल आहे.
advertisement

हॉटेल मालकाची हत्या

बीड जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरला आहे. हॉटेलमधील ग्राहकांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाच्या महागात पडले असून यामध्ये हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. जेवण झाल्यानंतर आरोपींनी बाहेरून दारू आणली आणि ते पित बसले होते. दरम्यान दारू पिताना त्यांच्यात भांडण झाली. ही भांडण सोडण्यासाठी हॉटेल मालक महेश गायकवाड आणि त्यांचा मुलदा आशुतोष गायकवाड मध्यस्ती करण्यासाठी गेले.त्यानंतर आरोपींनी मालकाशी वाद घालायला सुरुवात केली, हा वाद इतका पेटला की तरूणांनी शिवीगाळ करत मालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed : तुमची मुलगी मला द्या...केजच्या शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण, कुऱ्हाडीने केले सपासप वार
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement