Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! बायको माहेरी गेली अन् मुलाने अंबाजोगाईत गाठली क्रौर्याची परिसीमा

Last Updated:

Beed Crime News : अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे पोटच्या मुलाने वयोवृद्ध आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती कारणावरून पोटच्या मुलाने वयोवृद्ध आईची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळतीये.

Son finished Elderly mother in Yelda
Son finished Elderly mother in Yelda
Beed Crime News : बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. घरगुती वादातून एका पोटच्या मुलाने आपल्या वयोवृद्ध आईची निर्दयपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चोत्राबाई भानुदास सोन्नर असं दुर्दैवी मृत महिलेचं नाव आहे. वयाची साठी क्रॉस केलेल्या आईची स्वत:च्या मुलाने हत्या केली.

आईवर जीवघेणा हल्ला..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. त्यानंतर त्याचे घरी आईसोबत किरकोळ कारणांवरून वारंवार खटके उडत होते. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दोघांमध्ये मोठं भांडण झाले आणि रागाच्या भरात मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला, ज्यात आईचा मृत्यू झाला.

आरोपी मुलाला पोलिसांच्या ताब्यात

advertisement
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितलं की, घरगुती कलहातून ही हत्या झाली असावी. मात्र, यामागील नेमकं कारण आणि अधिक तपशील पोलीस तपासाअंती समोर येईल. या घटनेमुळे संपूर्ण येल्डा गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून, एका वयोवृद्ध आईची तिच्याच मुलाने केलेली हत्या सर्वांना सुन्न करून गेली आहे.
advertisement

बीडमधील गुन्हेगारीच्या घटना

दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. काल बीडमध्ये डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे ही घटना घडली. लोखंडी रोडने डॉक्टर दांपत्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : बीड पुन्हा हादरलं! बायको माहेरी गेली अन् मुलाने अंबाजोगाईत गाठली क्रौर्याची परिसीमा
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement