Walmik Karad : आका तुरुंगात तरी बीडमध्ये दहशत, DYSP च्या दाव्याने खळबळ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Walmik Karad : आका तुरुंगात असला तरी कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी दिला आहे.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी सध्या तुरुंगात आहेत. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या दहशतीचे अनेक किस्से, चर्चा समोर आल्या आहेत. मात्र, कराड हा तुरुंगात असूनही त्याची दहशत कायम असल्याचे म्हटले जात आहे. आका तुरुंगात असला तरी कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना डीवायएसपी विश्वांभर गोल्डे यांनी जबाब दिला. त्यांचा हा जबाब 23 फेब्रुवारी 2025 रोजी नोंदवण्यात आला.
कराड हा तुरुंगात असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचे गोल्डे यांनी म्हटले. कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही बीड पोलिस दोन कर्मचारी देऊन त्याला संरक्षण देत होते, याची माहितीदेखील अधिकृतपणे समोर आली आहे.
advertisement
कराडला अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले. परंतु, त्याची दहशत असल्याचा दावा करत त्याच्यासह परिसरात 18 अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून बंदोबस्तासाठी ठेवले होते. तसेच 22 जानेवारी रोजीही न्यायालयात हजर करताना 6 अधिकारी, 33 पुरुष व सहा महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते, असे गोल्डे यांनी म्हटले आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
April 22, 2025 11:43 AM IST


