Beed News: भगवान गडाकडून सुरेश धसांना 'नारळ' तर नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेची पाठराखण
- Published by:Prachi Amale
Last Updated:
धनंजय मुंडे पुन्हा पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडून समाजकार्य घडावं असं देखील नामदेव शास्त्री म्हणाले.
बीड : धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नगद नारायण गडाच्या नारळी सप्ताहाची सांगता आज बीडच्या शिरूर तालुक्यातील राक्षस भवन येथे झाली. नारायण गडाच्या नारळी सप्ताहाचे यंदाचे हे 73 वे वर्ष आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेविषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
मागील वर्षी शिरूर तालुक्यातील राक्षस भवन गावाला नारळी सप्ताहाचा मान मिळाला होता. नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या गोपाळकाल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सप्ताहासाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहात पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होती. गेवराई तालुक्यातील उमापूर या गावाला पुढील वर्षीच्या नारळी सप्ताहाचा मान मिळालाय. तर आमदार सुरेश धस यांना 2036 मध्ये खडकत गावात नारळी सप्ताहासाठी नारळ देण्यात आला आहे.
advertisement
नामदेवशास्त्रींकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण
नारळी सप्ताह सांगतेच्यावेळी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे भगवान गडाचेच आहेत असं नामदेव शास्त्री म्हणालेत. दरम्यान धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार होते मात्र हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही. म्हणून दौरा रद्द झाला अशी माहिती नामदेव शास्त्री यांनी दिलीय. त्याचबरोबर धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली आहे, ती पुन्हा सुरू व्हावी आणि धनंजय मुंडे पुन्हा पहिल्या पदावर येऊन त्यांच्याकडून समाजकार्य घडावं असं देखील नामदेव शास्त्री म्हणाले. एवढच नाही तर पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावे एवढेच बोलू.. असेही नामदेव शास्त्री म्हणाले.
advertisement
वारकरी संप्रदायाला प्रेरणा देणारा भगवानगड
भगवानबाबांच्या संकल्पनेतून भगवानगडाची निर्मिती करण्यात आली होती. सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचागड श्रीक्षेत्र भगवानगडची उभारणी करण्यात आली. भगवानगड लाखो वारकऱ्यांचं भक्तीस्थान बनलंय. आणि त्यामुळेच अठरापगड जातींना आणि वारकरी संप्रदायाला जोडून गेली सात दशकं भगवानगड उभा आहे. राज्यातील ऊसतोडणी मजुरांचं श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिलं जातं. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान आणि सर्वधर्मसमभावाचं प्रतीक अशी भगवानगडाची ओळख झालीय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 17, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News: भगवान गडाकडून सुरेश धसांना 'नारळ' तर नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेची पाठराखण


