advertisement

रायगडच्या राजकारणात खळबळ! भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते गोव्यात एकत्र; व्हायरल फोटोने उडाली झोप

Last Updated:

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

News18
News18
संतोष दळवी, प्रतिनिधी
रायगड :  रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा गोव्यातील एकत्रित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या फोटोमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्तास्थापनेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, भाजप गटनेते वैकुंठ पाटील, आमदार रवी पाटील, खासदार सुनील तटकरे तसेच भाजपचे वरिष्ठ नेते सतीश धारप यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित सदस्य दिसून येतात. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचीही उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी भाजप-राष्ट्रवादी सदस्यांना गोव्यात नेऊन ठेवले आहे, असा आरोप केला होता. त्या वक्तव्यानंतर हा फोटो समोर आल्याने राजकीय चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
advertisement

शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची शक्यता

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या फोटोमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच सदस्यही दिसून येत असून, त्यामुळे संभाव्य सत्तासमीकरणांबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष बाब म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 21  जागा जिंकूनही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement

जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

निवडणूक निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीने 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 16 जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या 31 इतकी होत असून, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी युतीची शक्यता अधिक बळावली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तासमीकरणांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत कोणता राजकीय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रायगडच्या राजकारणात खळबळ! भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते गोव्यात एकत्र; व्हायरल फोटोने उडाली झोप
Next Article
advertisement
चांदीचा 'सिल्व्हर बॉम्ब', 10 लाख रुपयांना मिळणार 1 किलो; 'डेन्जरस' भविष्यवाणी ऐकून सर्वांना फुटला घाम
चांदीचा सिल्व्हर बॉम्ब, 10 लाखांना मिळणार 1 किलो; डेन्जरस भविष्यवाणीने फुटला घाम
  • चांदीच्या बाजारात भूकंप

  • अंदाजाने ज्वेलर्समध्येही भीतीचे वातावरण

  • 'पॅनिक' न्यूजमुळे चांदीच्या बाजारात शुकशुकाट

View All
advertisement