तुकाराम मुंढे विरुद्ध भाजप आमदाराचा वाद पेटला, आरोपानंतर थेट कॉल करून धमक्या, प्रकरण पोलीस ठाण्यात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर हा वाद पोलीस पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना काळात तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेचा पदभार असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने काम केलं. त्यांच्यावर दोन महिलांनी छळाचा आरोप केला. त्यामुळे त्यांचं तातडीने सेवेतून निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी खोपडे यांनी केली. खोपडे यांच्या या मागणीनंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे.
कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नावाने खोपडे यांना धमक्या दिल्या जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी खोपडे यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावही त्यांनी लिहून दिलं आहे. तुम्ही तुकाराम मुंढेंविरुद्ध का बोलत आहात? त्यांच्या निलंबनाची मागणी तुम्ही का करत आहात? असे प्रश्न विचारत संबंधित फोनवरील व्यक्तीने आमदार खोपडे यांना धमकी दिल्याचा आरोप आहे.
advertisement
कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा अध्यक्ष कार्यालय, नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये धमकीच्या कॉलसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर मला पाहून घेण्याची धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले, ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
कृष्णा खोपडे यांचे नक्की आरोप काय?
तुकाराम मुंढे हे कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाले. त्या काळात त्यांच्या सात महिन्याच्या कार्यकाळात गैरप्रकार केले आहेत, असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला. त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी करून त्यांना अटक करा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.
advertisement
याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पात महिला अधिकारी होत्या. तुकाराम मुंढे यांनी त्या महिला अधिकाऱ्यांचा छळ केला. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, असे कृष्णा खोपडे यांनी सांगितले.
कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही. माहितीच्या अधिकारात आम्ही सर्व माहिती मागितली आहे. त्यांना अधिकार नसतानाही पाच वर्षे त्या पदावर दाखविण्यात आले. आम्ही मुंढे यांच्याविरोधात लक्षवेधी दाखल केलेली आहे. मुंढे यांनी कोरोना काळात नागपूरचा कसा सत्यानाश केला, हे मांडणार आहे, असंही खोपडे म्हणाले.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 09, 2025 6:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुकाराम मुंढे विरुद्ध भाजप आमदाराचा वाद पेटला, आरोपानंतर थेट कॉल करून धमक्या, प्रकरण पोलीस ठाण्यात


