Solapur Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! मनीषाजवळील'तो' पेनड्राईव्ह गेला कुठं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Solapur Dr. Shirish Valsangkar : पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूपत्रात बदल केले होते. आता, आणखी एका पेनड्राईव्हची चर्चा सुरू झाली आहे. हा पेनड्राइव्ह मनिषाकडे होता.
सोलापूर : सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. सोलापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूपत्रात बदल केले होते. आता, आणखी एका पेनड्राईव्हची चर्चा सुरू झाली आहे. हा पेनड्राइव्ह मनिषाकडे होता. आता हा पेनड्राइव्ह गेला कुठं, याची चर्चा सोलापुरात रंगली आहे.
न्यूरो फिजिशिअन असलेले डॉ. शिरीष वळसंगकर हे शुक्रवारी (18 एप्रिल) आत्महत्या केली. आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून काही गोष्टी समोर येत आहे. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्युपत्रात बदल केल्याची माहिती समोर आली. डॉ. वळसंगकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून विविध मुद्यांवर चौकशी सुरू आहे. डॉ. वळसंगकर यांचा मुलगा आणि सूनेचीदेखील चौकशी करण्यात आली.
advertisement
डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली. या सुसाइड नोटमध्ये रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनिषा माने हिच्या नावाचा उल्लेख होता. तिच्याकडून होत असलेल्या त्रासातून आत्महत्या करत असल्याचे डॉ. वळसंगकरांच्या सुसाइड नोटमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी मनिषाला अटक केली असून तिची कोठडीत चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात आता एका पेनड्राइव्हची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
तो पेनड्राइव्ह गेला कुठं?
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृ्तानुसार, मनिषाचे घर काही व्यक्तींना सापडले पाहिजे यासाठी वळसंगकर कुटुंबातील सदस्याने आपल्या दोन सेवकांना त्यांच्यासोबत पाठवले. या दोन सेवकांना तिच्याकडील एक पेनड्राइव्ह आणण्याची सूचना केली. या व्यक्ती इलेक्ट्ऱॉनिक तज्ज्ञ असल्याचे सांगितले. पण, त्या व्यक्ती पोलीस होत्या. सेवकांनी त्यांना मनीषाचं घर इथं असल्याचं दाखविले. त्या तज्ज्ञांनी म्हणजेच पोलिसांनी दोन सेवकांना परत जायला सांगितलं, आम्ही पेनड्राइव्ह घेऊन येतो, असे ते सेवकांना म्हणाले. आता पेनड्राइव्ह कुणाच्या ताब्यात आहे? त्या पेनड्राइव्ह मध्ये काय होते, याची चर्चा रंगली आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
April 24, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात नवा ट्विस्ट! मनीषाजवळील'तो' पेनड्राईव्ह गेला कुठं?