नातीची छेडछाड, एकनाथ खडसे आक्रमक, म्हणाले, महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी.....

Last Updated:

Eknath Khadse: इथल्या राजकीय 'आका'चे संरक्षण असल्यानेच आरोपी फरार आहेत आणि पोलिसांचेही त्यांना अभय आहे, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

एकनाथ खडसे
एकनाथ खडसे
जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या लेकीची काही टवाळखोरांनी छेड काढली होती. मात्र या घटनेतील आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांना धारेवर धरले तसेच गृहखात्यावरही कडाडून हल्ला चढवला.
फरार असलेले आरोपी हे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत आहेत, याचाच अर्थ ते जवळपासच आहेत. इथल्या राजकीय 'आका'चे संरक्षण असल्यानेच आरोपी फरार आहेत आणि पोलिसांचेही त्यांना अभय आहे, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला. राजकीय आकाचे संरक्षण असल्यानेच पोलीस त्यांना अटक करायला धजावत नाहीत, असे खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी प्रकार घडलेला असूनही...

advertisement
छेडछाड प्रकरणाला दहा दिवस पूर्ण झाले मात्र अजूनही पूर्णपणे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना यश आलेले नाही. महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी ही घटना घडलेली असताना सुद्धा पोलीस दुर्लक्ष करत असतील तर दुर्दैव आहे. आकांच्या सूचनेमुळेच आरोपींना अटक करायला पोलीस धजावत नाहीत. मंत्री असो किंवा आमदार, कोणाच्याही मुलींबाबत असा प्रकार घडला तर पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई करायला पाहिजे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
advertisement

लाडक्या बहीण योजनेवरून एकनाथ खडसे यांची राज्य सरकारवर जोरदार टीका

सत्तेत आल्यावर एकवीसशे रुपये देणार असे सांगूनही सरकार टाळाटाळ करत आहे. आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर आहे. राज्याची तूट ही चाळीस हजार कोटीपर्यंत गेलेली आहे.
ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला दहा वर्षे लागतील. ४६ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी शासन वापरणार आहे पण सरकार हा पैसा कुठून आणणार आहे? असा सवाल खडसे यांनी विचारला.
advertisement

पुढच्या दोन महिन्यात सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार देणेही शक्य होणार नाही

सर्वसामान्य जनतेवर कराचा बोजा बसवायचा आणि करात वाढ करायची, असेच शासन करणार आहे. पुढच्या दोन महिन्यात सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार देणेही शक्य होणार नाही. हे राज्य दिवाळखोरीकडे चाललेले आहे, असे खडसे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नातीची छेडछाड, एकनाथ खडसे आक्रमक, म्हणाले, महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीच्या घरी.....
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement