बिहारमध्ये महायुतीला बहुमत कसं मिळालं? कोणत्या फॅक्टरने काम केलं? एकनाथ शिंदे यांचं खास विश्लेषण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महाराष्ट्रात जसे महायुतीने महाविकास आघाडीला लोळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले तसेच बिहारमध्येही भाजप-नितीश कुमार यांच्या जोडीने तेजस्वी यादव आणि काँग्रेसला आस्मान दाखवून बिहार विधानसभेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवला.
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने २०० हून अधिक जागांवर आघाडी मिळवत २०१० सालच्या विजयाची पुनरावृत्ती केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीप्रमाणेच बिहारमध्येही लाडकी बहीण फॅक्टरचा प्रभाव दिसून आला. १ कोटी महिलांच्या खात्यात तब्बल १० हजार रूपये सरकारी तिजोरीतून टाकल्याने महिला वर्गाने एनडीएला भरभरून मतरुपी दान दिले. महाराष्ट्रात जसे महायुतीने महाविकास आघाडीला लोळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले तसेच बिहारमध्येही भाजप-नितीश कुमार यांच्या जोडीने तेजस्वी यादव आणि काँग्रेसला आस्मान दाखवून बिहार विधानसभेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवला. या निकालाचे विश्लेषण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
'लाडकी'ने कमाल केली-एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो. कारण, बिहारच्या लोकांनी विकासाला महत्व दिले. विकासावर विश्वास ठेवला. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्याचबरोबर नितीश कुमार यांनी केलेले काम, त्यांनी बिहारमध्ये केलेला विकास यावर लोकांनी विश्वास ठेवला. म्हणून त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.
लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी तेथे मोठ्या प्रमाणावर मतदान केले. महाराष्ट्रात जसे निर्विवाद बहुमत मिळाले, तसेच बहुमत आम्हाला बिहारमध्ये मिळाले. लाडक्या बहिणींचे मतदान वाढले. त्यांचा आशीर्वाद आम्हाला बिहारमध्येही मिळाला. बिहारच्या जनतेने जंगल राज नाकारले आणि विकास राज स्वीकारले. बिहारचे काही लोक आधी घोषणा द्यायचे की समोसे मे जब तक रहेगा आलू- तब तक रहेगा लालू... पण आता असे झालंय की जप तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज चालू....
advertisement
जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नीतीश कुमारजी यांचाच अनुभव आणि विश्वासार्हता फळाला आली. देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांची ‘चाणक्य नीती’ प्रभावी ठरली. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी जो इतिहास घडवला, त्याचीच पुनरावृत्ती आज बिहारमध्ये घडली! महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही एनडीएला ‘लॅण्डस्लाइड व्हिक्टरी’ मिळाली.
जंगलराज नकोय, तर विकासाचं ‘मंगलराज’ हवंय, बिहारी जनतेने सांगितलं
advertisement
मतांचं भरभरून दान घेत ‘मोदी-नीतीश’ यांच्या डबल इंजिनालाच बिहारने पसंती दिली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा लोकशाहीचा बहर आला आहे. आम्हाला जंगलराज नकोय, तर विकासाचं ‘मंगलराज’ हवंय, हे बिहारी जनतेने ठणकावून सांगितलं आहे. सुस्पष्ट विकासनीती, सकारात्मक आणि लोकाभिमुख राजकारणालाच बिहारने कौल दिलाय. ‘महाआघाडी’च्या फेक नॅरेटिव्हच्या अपप्रचाराला जनतेने फेकून दिलंय. जनतेच्या दरबारात फेक नॅरेटिव्ह चालत नाही, तर फक्त ‘काम पॉझिटिव्ह’ चालतं, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असे शिंदे म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बिहारमध्ये महायुतीला बहुमत कसं मिळालं? कोणत्या फॅक्टरने काम केलं? एकनाथ शिंदे यांचं खास विश्लेषण


