Eknath Shinde : होय, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, तर..., शिंदेंच्या खास शिलेदाराचा गौप्यस्फोट...

Last Updated:

Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते, असा गौप्यस्फोट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

होय, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, तर..., शिंदेंच्या खास शिलेदाराचा गौप्यस्फोट...
होय, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, तर..., शिंदेंच्या खास शिलेदाराचा गौप्यस्फोट...
जळगाव : राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा निर्माण झाला होता. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते, असा गौप्यस्फोट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
महायुतीच्या मागील सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत होते. तर, देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या. मात्र, भाजपकडून त्यांना संख्याबळाच्या आधारे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ घातली असल्याची चर्चा सुरू होती. सत्तावाटपाचा तिढा कायम असल्याने महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापन झाली नव्हती.
advertisement

एकनाथ शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाला नकार?

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी नकार दिला असल्याचे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आले होते. त्यानंतर आम्ही त्यांना भेटून विनंती केली की आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. एकनाथ शिंदे या नावाने सध्याचे महायुती सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती. त्यामुळेच, तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे असा आग्रह आम्ही केला होता, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
advertisement

तुम्ही मन मोठं करा...

गुलाबराव पाटील यांनी पुढं म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे आपल्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यांनीदेखील मोठे मन दाखवलं होतं. आपण सुद्धा यावेळेस मोठे मन दाखवलं पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे, अशी विनंती एकनाथ शिंदेंना केली होती. सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
advertisement

जळगावात गुलाबराव पाटलांचे जल्लोषात स्वागत...

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री पद मिळाल्यानंतर चोपड्यात रविवारी समस्त गुजर समाजाच्या वतीने जल्लोषात मिरवणूक व जाहीर सत्कार करण्यात आला. मंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाल्यानंतर त्यांचं स्वागत जेसीबीवरून फुलांच्या पाकळ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी गुलाबराव पाटील यांची बग्गीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उंटावर, घोड्यांवर स्वार झालेले नागरिक तर विद्यार्थिनींनी मराठमोळी साडी परिधान करून लेझीम खेळत होते. तसेच कळसधारी महिला देखील सहभागी झालेल्या होत्या.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : होय, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नव्हते, तर..., शिंदेंच्या खास शिलेदाराचा गौप्यस्फोट...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement