शिरूरमध्ये बिबट्याचा धुडगूस, अनेकांवर हल्ले, वनमंत्री नाईक म्हणाले, बिबट दिसता क्षणी गोळ्या घाला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरूर: गेल्या दोन आठवड्यांपासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या तीन चार तालुक्यांत बिबट्याने धुडगूस घातला असून अनेकांवर हल्ले केले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात चार ते पाच जणांना मृत्यू झाला असून गुरांवरही हल्ले झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात होत असलेल्या आंदोलनाला वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट दिली.मी मंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून आल्याचे सांगत आंदोलनातील गुन्ह्यांवर कारवाई करू नका असे त्यांनी प्रशासानाला बजावले तसेच हिंस्र बिबट लोकांसमोर येत असेल तर त्याला गोळ्या घाला, असे थेट आदेश वनमंत्री नाईक यांनी दिले.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतीच्या हंगामामुळे शेतात काम करताना बिबट्याचे हल्ले होत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीये. बिबट्याच्या हल्ल्यामुळे जनावरांच्या सुरक्षेसाठी इथल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर
स्थानिकांनी प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडले. बुधवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर भागातील गावांना भेटी दिल्या.
advertisement
हा दोष कुणाचा? वनमंत्री नाईक हतबल
गणेश नाईक म्हणाले, मी मंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून इथे आलो आहे. प्रशासनाने आंदोलनातील गुन्ह्यांवर कारवाई करू नये. इथल्या शेतकऱ्यांनी शेतात ऊस लावला आहे. ऊसात ससे, लांडगे, कोल्हे असल्याने बिबट्याला आयती शिकार मिळते. हा दोष कुणाचा? अशी हतबलता वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केली.
advertisement
हिंसक बिबट लोकांसमोर येत असेल तर त्याला गोळ्या घाला
उत्तर पुणे जिल्ह्यात ही परिस्थिती सर्व ठिकाणी उद्भवली आहे. पण यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असून हिंसक बिबट लोकांसमोर येत असेल तर त्याला गोळ्या घाला, अशी आक्रमक भूमिका वनमंत्री गणेश नाईकांनी घेतली. वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 12, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिरूरमध्ये बिबट्याचा धुडगूस, अनेकांवर हल्ले, वनमंत्री नाईक म्हणाले, बिबट दिसता क्षणी गोळ्या घाला


