Gauri Garje: गौरी गर्जे प्रकरणात नवा ट्विस्ट,पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; म्हणाली 2022 पासून...

Last Updated:

गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे.

News18
News18
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई :  राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीच्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. अन्य महिलेसोबतचे संबंध उघड झाल्याने अनंतसह त्याचे कुटुंबीय गौरीला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे आरोप देखील त्यांनी केलाय. या प्रकरणाी कोर्टात सुनावणी सुरू असून आता आता गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे.
advertisement
डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार असून पोलीस वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपास करणार आहेत. अनंत गर्जेची पॉलीग्राफ टेस्ट करणे आवश्यक असल्याची पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे. पुन्हा पोलीस कोठडी देण्याचे अधिकार अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी द्या अशी पोलिसांनी मागणी केली होती. यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब घेतल्याची माहिती दिली आहे.
advertisement

महिलेने पोलिसांना काय जबाब दिला? 

पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, एफआयरमध्ये नाव नमूद असलेल्या अनंत गर्जे यांच्या जुन्या प्रेयसीचा जबाब वरळी पोलिसानी नोंदवला.2022 पासून माझा आणि अनंतचा काहीही सबंध नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. तसेच गौरीला घरी सापडलेल्या कागदपत्रांबद्दल काहीही कल्पना नाही.

पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर 

अनंतच्या शरीरावर असलेल्या जखमांबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे. अनंतने खिडकीतून आतमध्ये प्रवेश करताना त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या होत्या. अनंत गौरीला घेऊन पोतदार रुग्णालयात गेला तेव्हा ती मृत झाल्याचे कळताच त्याने स्वत:चे डोके भिंतीवर आपटण्याचाही प्रयत्न केला होता. पोतदार रुग्णालयात अनंत स्वतःला मारून घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. तसेच, पोलिसांनी अनंत गर्जेने आपल्या घराच्या खिडकीला ज्या व्यक्तिकडून जाळ्या बसवल्या त्याचाही जबाब नोंदवला आहे. पोलिसानी जाळ्या बसवणाऱ्या व्यक्तीलाच जाळीतून आतमध्ये प्रवेश करता येतो का याचे प्रात्यक्षिक दाखवायला सांगितले आणि चित्रीकरण केलेले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gauri Garje: गौरी गर्जे प्रकरणात नवा ट्विस्ट,पती अनंतची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; म्हणाली 2022 पासून...
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement