Pune Marathi Gujarati : ' मैं गुजराती हूं, मराठी नहीं बोलूंगा', पुण्यातील तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलं काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Pune Marathi Gujarati : मराठी भाषा आणि त्याच्या अपमानाच्या मुद्यावरुन मागील काही महिन्यांपासून चांगलंच वातावरण तापलं आहे. पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुणे: मराठी भाषा आणि त्याच्या अपमानाच्या मुद्यावरुन मागील काही महिन्यांपासून चांगलंच वातावरण तापलं आहे. पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका गुजराती तरुणाला मराठीत बोलण्याची सक्ती केल्याचे दिसत आहे. त्यावर आपण मराठीत बोलणार नसल्याचे या तरुणाने सांगितले. पुण्यातील या घटनेने पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
पुण्यात पुन्हा एकदा भाषेवरून झालेल्या वादामुळे वाद निर्माण झाला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक गुजराती तरुणाचा स्थानिकाशी वाद झाल्याचे दिसून येत आहे. या वादात स्थानिक मराठी तरुणाकडून त्याला मराठीत बोलण्यास सांगितले जाते. त्यावर दोघांमध्ये वाद होतो. या वादात गुजराती तरुण ' मैं गुजराती हूं, मराठी नहीं बोलूंगा', असं म्हणत असल्याचे दिसून आले.
advertisement
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तरुण म्हणतो की, मी गुजराती आहे. मी कोणत्या भाषेत बोलावं यावर कोणी नियंत्रण का ठेवावं, भारतात फक्त हिंदीच वापरली जाईल, असेही व्हिडीओत दिसून आले आहे.
advertisement
सोशल मीडियावर पडसाद...
या दोन तरुणांमध्ये नेमका वाद कोणत्या कारणांनी सुरू झाला, हे स्पष्ट झाले नाही. या व्हिडीओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. काहींनी या गुजराती तरुणाचे समर्थन केले आहे. महाराष्ट्रात हिंदी बोललं तर चुकीचे काय असा सवाल करताना मराठी सक्तीचा का असाही सूर उमटला आहे. तर, काहींनी ज्या राज्यात अनेक वर्ष राहतो, त्या ठिकाणची भाषा, संस्कृती आत्मसात करायला हवी हा मुद्दा अधोरेखित केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Marathi Gujarati : ' मैं गुजराती हूं, मराठी नहीं बोलूंगा', पुण्यातील तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं घडलं काय?


