प्रवाशांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगरहून मुंबई-बंगळुरूला जाणारी विमानसेवा 96 तासांसाठी रद्द
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इंडिगोने छत्रपती संभाजीनगर-मुंबई आणि बंगळूरू विमानसेवा तांत्रिक बिघाडामुळे १३ डिसेंबरपर्यंत रद्द केली असून प्रवाशांना मोठी गैरसोय व आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: मागच्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या छत्रपती संभाजीनगर इथून मुंबई आणि बंगळूरू विमानसेवांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीने रात्रीचे मुंबई-छत्रपती संभाजीनगर-मुंबई विमान १३ डिसेंबरपर्यंत रद्द केलं आहे. दुसरीकडे बंगळूरू-छत्रपती संभाजीनगर-बंगळूरू हे विमानही पुढील तीन दिवस रद्द राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
विमानसेवा १३ डिसेंबरपर्यंत रद्द
इंडिगोच्या रात्रीच्या मुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई या विमानाची सध्या १३ डिसेंबरपर्यंतची बुकिंग बंद करण्यात आली आहे. या विमानाची बुकिंग आता १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे, याचाच अर्थ हे विमान १३ डिसेंबरपर्यंत रद्दच राहणार आहे. ऐन प्रवासाच्या दिवशी, सोमवारी, मुंबईचे रात्रीचे विमान रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना रस्ते मार्गाने मुंबईला ये-जा करावी लागली.
advertisement
बंगळूरूची सेवाही तीन दिवस थांबली
इंडिगो कंपनी आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी बंगळूरूसाठी विमानसेवा पुरवते. मात्र, ही बंगळूरू-छत्रपती संभाजीनगर-बंगळूरू विमानसेवा ९, ११ आणि १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. विमानसेवा अचानक रद्द झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून मुंबई आणि बंगळूरूला जाणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था करावी लागली. यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे.
advertisement
तुम्ही जर अजूनही प्रवासासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आताच सोय करा. विमानसेवा रद्द झाल्यामुळे रेल्वेवर अधिक जास्त भार आला आहे. त्यामुळे रेल्वेचं तिकीट मिळणं कठीण झालं आहे. बस देखील अव्वाच्या सव्वा भाडं घेत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे प्रवाशांचा संताप आणि गैरसोय झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून इंडिगोच्या सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड, अपुरे कर्मचारी यामुळे विमानसेवा रद्द करण्यात आले आहेत.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 09, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रवाशांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगरहून मुंबई-बंगळुरूला जाणारी विमानसेवा 96 तासांसाठी रद्द


