साखरपुड्याचा ट्रेलर बघितला, आता लग्न कसं करतात ते दाखवतो; चवताळलेल्या इंदुरीकर महाराजांचा नवा Video
- Published by:Prachi Amale
Last Updated:
इंदुरीकर महाराज यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत असून आता त्यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या कार्यक्रमावर प्रचंड खर्च करण्यात आला, यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे. इंदुरीकर महाराज आपल्या प्रत्येक किर्तनात सांगतात लग्न साध्या पद्धतीने करा आणि त्यांनी मात्र लेकीचा साखरपुडा अतिशय शाही पद्धतीने केला. लेकीचा साखरपुडा अतिशय शाही पद्धतीने केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाले. त्याला आता इंदुरीकर महाराज यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच साखरपुड्यापेक्षा लग्न धुमधडाक्यात करणार असल्याचे म्हटले आहे.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील 'वसंत लॉन्स' येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात त्यांच्या लेकीची मंगल कार्यालयात शाही एन्ट्री… गाड्यांचा मोठा ताफा… अंगावरचे कपडे, ओपन जिप आणि मुलीचा गाडीच्या बाहेर येत तो शाही थाट चर्चेचा विषय बनला. मुलीच्या कपड्यांवर टीका केल्याने इंदुरीकर महाराज प्रचंड संतापले आहे. त्यांनी टीका करणाऱ्यांचा चांगला समाचार तर घेतला पण त्याचबरोबर दु:खी झाल्याने त्यांनी तीन दशकाची कीर्तन सेवा देखील थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या विचारत असल्याने इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत आले.
advertisement
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर?
इंदुरीकर महाराज म्हणाले, मला माहीत होतं या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना चॅलेंज सांगतो मी (मुलीचं) लग्न याच्यापेक्षाा टोलेजंग करणार आहे, बघू कोणाचं काय म्हणणं आहे . ही सगळी विकली गेलेली लोकं आहेत, दुसऱ्याला किती त्रास द्याव यालाही मर्यादा आहेत हो...
लवकरच फेटा खाली ठेवणार : इंदुरीकर महाराज
advertisement
मला लावा ओ घोडे माझा पिंड गेला पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. आता मी कंटाळलो आता मी क्लिप दोन ते तीन दिवसात टाकणार आहे. तीस वर्षात मी सगळ्या टीका सहन केल्या पण आता माझ्या घरावर आलेत. माझ्यापर्यंत टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेलं हे ठीक नाही, त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे, म्हणून मी आता फेटा खाली ठेवण्याच्य विचारात आहे.
advertisement
इंदुरीकरांवर का टीका केली?
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा सोहळ्याला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे. इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमातील काही चांगल्या गोष्टींवर लक्ष वेधले असले, तरी त्यांच्या उपदेशाच्या विपरीत साखरपुड्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च सध्या चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 14, 2025 3:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साखरपुड्याचा ट्रेलर बघितला, आता लग्न कसं करतात ते दाखवतो; चवताळलेल्या इंदुरीकर महाराजांचा नवा Video


