मतदानाच्या दिवशीच कोर्टातून मोठी अपडेट, आजच्या मतदानाचा निकाल 19 दिवसांनी लागणार?

Last Updated:

Maharashtra Local Body Election: ऐन मतदानाच्या दिवशी मुंबई हाय कोर्टातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आज मतदान होत असलं तर याचा निकालासाठी अजून १९ दिवसांची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती समजत आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी अवघ्या काही मिनिटांत मतदानाला सुरुवात होणार आहे. अनेकांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. यासर्व निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार असल्याचं निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केलं आहे. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी मुंबई हाय कोर्टातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आज मतदान होत असलं तर याचा निकालासाठी अजून १९ दिवसांची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती समजत आहे.
खरं तर, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतला घोळ समोर आल्यानंतर राज्यातील काही नगर परिषदा आणि नगर पंचायतीचं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. उर्वरित ठिकाणी आज म्हणजे २ डिसेंबरला मतदान पार पडत आहे.
advertisement
ज्या ठिकाणंचं मतदान पुढे ढकललं आहे. तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. राज्यातील सर्वच ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रित लावता येईल का? अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचं निवेदन आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक आयोग खंडपीठाकडे देणार आहे.
advertisement
त्यामुळे आज मतदान होत असलं तरी याचा निकाल कधी लागणार? याबाबत सस्पेन्स वाढला आहे. २ डिसेंबरच्या निवडणुका ठरल्यानुसारच होतील, तर उर्वरित २० डिसेंबरला होतील. मात्र, दोन्ही टप्प्यांच्या निवडणुकांचे निकाल एकत्रित जाहीर करायचे की वेगवेगळे याचा अंतिम निर्णय आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोग काय निवेदन करणार? यावरून स्पष्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदानाच्या दिवशीच कोर्टातून मोठी अपडेट, आजच्या मतदानाचा निकाल 19 दिवसांनी लागणार?
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement