Jalgaon : जळगाव ग्रामीण मंतदारसंघात शेवटच्या तीन तासात मिनिटाला 412 मतं, महिलांची संख्या अधिक
- Published by:Suraj
Last Updated:
राज्यात सगळीकडे दुपारपर्यंत संथगतीने मतदान सुरू होते. मात्र सायंकाळच्या सत्रात बहुतांश जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात बुधवारी मतदान पार पडले. राज्यात सगळीकडे दुपारपर्यंत संथगतीने मतदान सुरू होते. मात्र सायंकाळच्या सत्रात बहुतांश मतदान झाले. मतदानाची सकाळच्या सत्रातली टक्केवारी ही दुपारनंतरच्या तुलनेत खूपच कमी दिसून येतेय. जळगाव ग्रामीण मतदारसंघात शेवटच्या तीन तासात २२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं. यात महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलंय.
advertisement
जळगाव ग्रामीण मतदारसंघात शेवटच्या तीन तासांत २२ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले. त्यातही महिलांचा टक्का पुरुष मतदारांच्या टक्क्यांपेक्षा पुढे गेला आहे. अगदी शेवटच्या तीन तासांत मिनिटाला ४१२ मते नोंदवली गेली. पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेनेतर्फे व माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीतर्फे या मतदारसंघात उमेदवार होते. दोघांच्याही समर्थकांनी मतदारांना प्रोत्साहित केल्यामुळे मतदान वाढले असले तरी त्यात सर्वाधिक वाटा महिलांचाच आहे.
advertisement
पहिल्यांदा मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम असल्याचे मानले जात असून, याचा फायदा मंत्री गुलाबराव पाटील यांना होईल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते आहे.
यंदा महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यामुळे पहिल्यांदाच महिलांच्या मतांची टक्केवारी पुरुषांच्या टक्केवारीच्या पुढे गेली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात ६६.६७ टक्के मतदारांनी अधिकार बजावला. आतापर्यंतचे हे मतदारसंघातील सर्वोच्च मतदान आहे. महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढल्यामुळेही ही टक्केवारी वाढली आहे.
advertisement
सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघात ६०.७७ टक्के एकूण मतदान आले होते. तेव्हा एकूण महिला मतदारांच्या ५१.७२ टक्के महिलांनी मतदान केले होते तर एकूण पुरुष मतदारांपैकी ५९.८७ टक्के मत्तदारांनी आपला हक्क बजावला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2024 11:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon : जळगाव ग्रामीण मंतदारसंघात शेवटच्या तीन तासात मिनिटाला 412 मतं, महिलांची संख्या अधिक


