बहिणीच्या घरी आला, बारावीचा निकाल लागला, कमी मार्क मिळाल्याचं कळलं, क्षणात होत्याचं नव्हतं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon News: बारावीच्या परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने भावेश महाजन तणावात होता. बहिणीच्या घरातच त्याने आपल्या आयुष्याची दोर कापून घेतली.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना पाचोरा तालुक्यातील देशमुख वाडी येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव भावेश प्रकाश महाजन असे आहे.
भावेश आपल्या बहिणीकडे देशमुखवाडी येथे काही दिवसांपासून राहायला आला होता. त्याने जळगावच्या एरंडोल येथे विद्यालयात बारावीची परीक्षा दिलेली होती. परीक्षा संपल्यानंतर सुट्टीसाठी बहिणीकडे तो आला होता. मात्रनुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात त्याला फक्त 42% मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
भावेश घरात एकटाच होता. घरातील कुणीच नसताना त्याने दोरीच्या साहाय्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने बहीण घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तात्काळ पाचोरा गावातील नागरिकांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
advertisement
दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 12, 2025 9:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बहिणीच्या घरी आला, बारावीचा निकाल लागला, कमी मार्क मिळाल्याचं कळलं, क्षणात होत्याचं नव्हतं


