सेल्फी ठरला अखेरचा! जळगावात दोन मित्रांना रेल्वेनं उडवलं, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर
- Published by:Suraj
Last Updated:
नाशिकला फिरण्यासाठी जात असताना दोन मित्रांना ट्रेनने धडक दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : नंदुरबारहून जळगावला आलेले दोघे मित्र गाडी आऊटरला थांबल्यामुळे रुळावरून पायी चालत रेल्वे स्टेशनवर येत होते. जळगाव थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने त्या दोघे मित्रांना धडक दिली. यामध्ये ओम विजय वाघेला (वय २३, रा. राजकोट, गुजरात) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समर्थ सुनिलसिंग रघुवंशी (वय २२, रा. नंदुरबार) हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे दोघे मित्र रेल्वे स्टेशनवर थांबवलेल्या मित्रांसोबत नाशिकला फिरायला जाणार होते. मात्र त्यापूर्वीच दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातली.
advertisement
राजकोट येथील ओम वाघेला आणि समर्थ सूर्यवंशी हे दोघे मित्र नंदुरबार येथून रेल्वेने जळगावला आले. सुरतहून येणारी रेल्वे आऊटरला काही वेळ थांबली. बराच वेळ झाला तरी रेल्वे आऊटरला असल्यामुळे दोन्ही मित्रांनी रेल्वेतून उतरले आणि ते रेल्वे रूळ लगतच चालत रेल्वे स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावरच जळगावला थांबा नसलेल्या तुलसी एक्सप्रेसने रूळावरून चालणाऱ्या दोघा मित्रांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे मित्र रेल्वे रूळ लगत फेकले गेले.
advertisement
ओम व समर्थ हे दोन्ही मित्र बडोदा येथे एकाच महाविद्यालयात शिकायला होते. जळगावहून काही मित्रांसोबत ते नाशिकला फिरण्यासाठी जाणार होते. त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर ओम व समर्थ यांचे काही मित्र त्यांना घ्यायला देखील आले होते. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे त्या दोघांची मित्रांसोबत देखील भेट होऊ शकली नाही.
advertisement
ओम आणि समर्थ हे दोघे जळगावला येत असताना त्यांनी घटनेच्या काही मिनिटांपूर्वी सेल्फी काढून तो मित्रांसोबत शेअर केला होता. मात्र या दुर्देवी घटनेमुळे ओमसाठी हा सेल्फी अखेरचा ठरला असे म्हणत त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2024 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सेल्फी ठरला अखेरचा! जळगावात दोन मित्रांना रेल्वेनं उडवलं, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर


