दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हालचाली, मुंब्य्रानंतर कुर्ल्यात महाराष्ट्र ATSची छापेमारी, चौकशीत काय सापडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
महाराष्ट्र एटीएसने मुंब्य्रानंतर आता कुर्ल्यात छापेमारी केली आहे. मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचं कनेक्शन कुर्ल्यात आढळलं होतं. त्यामुळे आजची ही कारवाई करण्यात आली होती.
Maharashtra ATS Raids : नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर देशातील प्रमुख शहरे हाय अलर्टवर गेली आहेत.या दरम्यान एटीएसकडून छापेमारीही सूरू आहे.महाराष्ट्रातही अशा कारवायांना वेग आला आहे.महाराष्ट्र एटीएसने मुंब्य्रानंतर आता कुर्ल्यात छापेमारी केली आहे. मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या एका व्यक्तीचं कनेक्शन कुर्ल्यात आढळलं होतं. त्यामुळे आजची ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत महाराष्ट्र एटीएसच्या हाती काय काय लागलं आहे? हे जाणून घेऊयात.
दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्र एटीएसने मंगळवारी मुंब्य्रात छापेमारी केली होती. या कारवाईत मुंब्रा येथून ताब्यात घेण्यात आलेल्या इब्राहिम आबादीचं कुर्ला कनेक्शन समोर आलं होतं. त्यानंतर आज कुर्ल्यातही छापेमारी करण्यात आली होती. कुर्ल्यातील एम के हाईट या आबादीच्या घरी एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान इब्राहिम आबादीची पहिली पत्नी आणि तीन मुले कुर्ला परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. आबादीने दुसरे लग्न केल्यानंतर कुर्ला परिसर सोडला होता,अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
मुंब्य्रात छापेमारी
खरं तर काही दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र एटीएसने धाड टाकून काही लोकांना अटक केली होती. यावेळी आरोपींची चौकशी दरम्यान मुंब्रा मध्ये राहणारा एका शिक्षकाचा संबंध असल्याचा माहिती समोर आली होती.
त्यानंतर आज महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा येथील कौसा विभागामध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली होती. या धाडी दरम्यान घरातले मोबाईल कम्प्युटर आणि इतर सामग्री हस्तगत करण्यात आले होते. यासोबत मुंबईतील कुर्ल्यामधील त्याच्या दुसरा घरी महाराष्ट्र एटीएसने छापा टाकून पुढील तपास सूरू केला आहे.
advertisement
सदरचा शिक्षक हा जमात ये इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. शिक्षकाचे नाव समजू शकलेले नाही. पण या कारवाईत आतापर्यंत तरी घरातले मोबाईल कम्प्युटर आणि इतर सामग्री हस्तगत करण्यात आले होते.आता एटीएसच्या हाती काय काय माहिती लागते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे.
advertisement
'अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट' या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 8:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हालचाली, मुंब्य्रानंतर कुर्ल्यात महाराष्ट्र ATSची छापेमारी, चौकशीत काय सापडलं?


