धोक्याची घंटा! धुळ्यात पारा ५ अंशांवर, पुढील ४८ तास जीवघेणी थंडीची लाट येणार, ३ जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रातील वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्ह्यांत उमाशंकर दास यांच्या इशार्यानुसार ९ ते १२ डिसेंबरदरम्यान तीव्र थंडीची लाट येणार असून तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट अपेक्षित.
मुंबईसह उपनगरात पुन्हा गारठा वाढायला सुरुवात झाली आहे, तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्यात हाडं गोठवणारी थंडी वाढत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्य भागासह महाराष्ट्रातही आगामी काळात थंडीचा कडाका वाढणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत तीव्र थंडीची लाट येईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढचे 48 तास धोक्याचे असणार आहेत.
राज्यात थंडीचा जोर वाढणार
विदर्भ आणि मराठवाड्यात ९ ते १२ डिसेंबरपर्यंत थंडीच्या तीव्र लाटेचा परिणाम जाणवणार आहे. थंडीच्या या तीव्र लाटेमुळे किमान तापमान लक्षणीयरीत्या घट होईल. मध्य महाराष्ट्रात १० ते १२ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी शीत लहरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात पुढील ४ दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील मैदानी प्रदेशात ९ ते १२ डिसेंबर या काळात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. यात पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानचा समावेश आहे. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ या भागांत ९ ते १२ डिसेंबरपर्यंत शीत लहरीचा प्रभाव कायम राहील. महाराष्ट्रातील किमान तापमान पुढील ४ दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने खाली येईल. त्यानंतर पुढील तीन दिवस तापमानात मोठे बदल अपेक्षित नाहीत.
advertisement
धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 5 अंशांपर्यंत तापमान खाली आलं आहे. तर निफाडमध्ये देखील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यवतमाळ, पुणे, जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला असून कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमानात घट झाल्याने हाडं गोठवणारी थंडी वाढली आहे.
advertisement
वर्धा, नागपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट येईल असा इशारा हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिला आहे. त्यामुळे या भागातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या तिन्ही जिल्ह्यात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहावं, शेतकऱ्यांना देखील पिकाळी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 7:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धोक्याची घंटा! धुळ्यात पारा ५ अंशांवर, पुढील ४८ तास जीवघेणी थंडीची लाट येणार, ३ जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट


