२०२६ वर्षात शासकीय सुट्ट्या किती? दिवाळीला एक जास्तीची सुट्टी! संपूर्ण यादी वाचा...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Government: महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून, भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २०२६ सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी शासन निर्णय (GR) आणि विविध विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. ज्यात प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), होळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), दिवाळी, भाऊबीज (११ नोव्हेंबर) गुरूनानक जयंती, आणि नाताळ (२५ डिसेंबर) यांसारख्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे, ज्यांची घोषणा सामान्य प्रशासन विभाग करतो आणि त्या राजपत्रित सुट्ट्या असतात, ज्यात बँका आणि सरकारी कार्यालये बंद असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 10:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
२०२६ वर्षात शासकीय सुट्ट्या किती? दिवाळीला एक जास्तीची सुट्टी! संपूर्ण यादी वाचा...









