BEST Bus : बेस्टचा मोठा निर्णय! तब्बल 23 बस मार्गांमध्ये केले मोठे बदल; पाहा नवे वेळापत्रक

Last Updated:

BEST Bus Route Change : बेस्टने 23 बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या मार्गांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे.

BEST Bus Route Changes
BEST Bus Route Changes
मुंबई : मुंबईत बेस्ट उपक्रमाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीतील बदल, प्रवाशांची वाढती मागणी आणि कमी बस ताफा या पार्श्वभूमीवर बेस्टने आपल्या 23 बस मार्गांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. हे नवीन बदल शनिवार, 1 नोव्हेंबरपासून लागू झाले असून बेस्ट प्रशासनानुसार या बदलांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर, जलद आणि सुटसुटीत प्रवास करता येणार आहे.
असा असेल नवा मार्ग
या नव्या नियोजनात बेस्टने काही महत्त्वाच्या मार्गांवर वातानुकूलित (एसी) बस सुरू केल्या आहेत. एकूण आठ बसमार्गांना एसी बसचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर, वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हा नवीन ए-207 बस मार्गही सुरू करण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मेट्रो, रेल्वे आणि प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये सहज पोहोचता येईल.
advertisement
नवीन ए-207 बस मार्ग जी. डी. सोमानी मार्ग, कुलाबा मार्केट, बेरेक नं. 1, नवी नगर, सह्याद्री नगर, एल्फिन्स्टन ब्रीज, दादर, प्रभादेवी, महालक्ष्मी, हाजी अली, पेडर रोड, गिरगाव चौपाटीमार्गे सीएसएमटीपर्यंत धावणार आहे. हा मार्ग खासगी, सरकारी आणि विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
एसी बसमध्ये बदललेले काही महत्त्वाचे मार्ग असे आहेत -
ए-207 : मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक
advertisement
ए-211 : वांद्रे बसस्थानक ते फादर अँग्नेल आश्रम
ए-215 : वांद्रे रेक्लेमेशन ते टाटा वसाहत
ए-399 : ट्रॉम्बे ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
ए-410 : विक्रोळी आगार ते महाकाली गुंफा
ए-604 : नागपाडा स्थानक ते महाकाली मुहा
ए-605 : भांडुप स्टेशन ते टेम्भीपाडा
ए-606 : भांडुप स्टेशन ते अशोक केदारे चौक
advertisement
'या' भागातील प्रवाशांना होणार फायदा
या बदलांमुळे पूर्व उपनगरात म्हणजेच गोरेगाव, दिंडोशी, ठाणे लिंक रोड, विक्रोळी, घाटकोपर-अंधेरी, भांडुप आणि मुलुंड परिसरातील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. बेस्टचे जाळे अधिक मजबूत होणार असून, विद्यार्थी, महिला, कार्यालयीन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठा फायदा होईल.
बेस्ट प्रशासनाचा विश्वास आहे की या सुधारित मार्गांमुळे प्रवाशांची संख्या वाढेल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होईल. वाहतूक कोंडी कमी करण्यासही या नव्या बदलांचा उपयोग होईल. ही नवी बससेवा शहरातील मेट्रो आणि रेल्वे प्रवासाला मदत करणारी ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BEST Bus : बेस्टचा मोठा निर्णय! तब्बल 23 बस मार्गांमध्ये केले मोठे बदल; पाहा नवे वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement