सोलापूरचा नादखुळा, कृषी प्रदर्शनात होतेय 'खासदार', 'आमदार' आणि 'सरपंचा'ची विक्री
- Published by:sachin Salve
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
यंदाही सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून, चीनचा बोकड, सहा किलोचा कोंबडा अन् बुटकी गाय आणि चार पायाचा कोंबडा हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षणाचे केंद्र बनला आहे. परंतु...
सोलापूर: सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून, चीनचा बोकड, सहा किलोचा कोंबडा अन् बुटकी गाय आणि चार पायाचा कोंबडा हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षणाचे केंद्र बनला आहे. परंतु, पशुपालकांसाठी भाळवणी येथील कडबा कुट्टी मशीन चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्या मशीनचं नाव आमदार, खासदार,सरपंच आणि उपसरपंच असं ठेवण्यात आलं असून कृषी प्रदर्शनामध्ये चक्क आमदार,खासदार, सरपंच आणि उपसरपंचाची विक्री होत आहे. या कडबा कुट्टी मशीन संदर्भात अधिक माहिती रियाज शिकलकर यांनी Local 18 ला दिली आहे.
सोलापूर कृषी प्रदर्शनात सांगली जिल्ह्यातील भाळवणी गावातील एका कंपनीकडून कडबा कुट्टी मशीन या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे. उपसरपंच या मशीनची वैशिष्ट्य म्हणजे, ज्या पशुपालकांकडे 10 जनावरे हे त्यांच्यासाठी ही कडबा कुट्टा मशीन बनवण्यात आली आहे आणि याची किंमत 27 हजार 500 रुपये आहे.
तर सरपंच कडबा कुट्टी मशीन याची किंमत 29 हजार 500 रुपये आहे. या कडबा कुट्टी मशीनला तीन एचपी ची मोटर बसविण्यात आली आहे. ज्या पशुपालकांकडं 10 ते 20 जनावरे आहेत. त्यांच्यासाठी ही कडबा कुट्टी मशीन बनवण्यात आली आहे. खासदार मशीन तासाला दोन टन कडबा कटिंग करते. ज्या पशुपालकांकडे 50 जणावर आहे त्यांच्यासाठी ही कडबा कुट्टी मशीन बनवण्यात आली आहे. आणि खासदार ची किंमत 55 हजार रुपये आहे.
advertisement
तर आमदार या मशीनची किंमत 35 हजार रुपये आहे. ज्या प्रकारे या कडबा कुट्टी मशीनची नावे ठेवण्यात आली आहे त्या नावाप्रमाणे ते काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील प्रतिसाद चांगला मिळत असल्याची माहिती रियाज शिकलकर यांनी दिली आहे.सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये आमदार या नावाची कडबा कुट्टी मशीन आतापर्यंत 20 शेतकऱ्यांनी बुकिंग केले आहे. आमदार खासदार सरपंच आणि उपसरपंच असे मिळून आतापर्यंत साठ शेतकऱ्यांनी या कडबा कुट्टी मशीन बुक केले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
December 25, 2024 10:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरचा नादखुळा, कृषी प्रदर्शनात होतेय 'खासदार', 'आमदार' आणि 'सरपंचा'ची विक्री

