MCA Election : जितेंद्र आव्हाडांना विजयी करा, भाजपच्या आशिष शेलारांकडून प्रचार, आजच्या मतदानाकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष

Last Updated:

MCA Election : एरवी राजकारणात एकमेकांवर टीकेची तोफ डागणारे राजकारणी क्रिकेटमधील 'अर्थ'कारण लक्षात घेऊन एकाच टीममधून खेळत आहेत.

जितेंद्र आव्हाड-आशिष शेलार
जितेंद्र आव्हाड-आशिष शेलार
मुंबई: देशातील क्रिकेट संघटनांपैकी अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली.आज बुधवारी उपाध्यक्ष, खजिनदार आणि इतरही महत्त्वाच्या पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे एरवी राजकारणात एकमेकांवर टीकेची तोफ डागणारे राजकारणी क्रिकेटमधील 'अर्थ'कारण लक्षात घेऊन एकाच टीममधून खेळत आहेत. क्रिकेटमध्ये पक्षीय भेदाभेद नको, असे सांगून आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रचार केला.

कोणकोणत्या पदांसाठी निवडणूक होणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सात अर्ज आले होते. परंतु अर्ज माघारीच्या दिवशी दिग्गज राजकारण्यांनी आपापले अर्ज माघारी घेऊन अजिंक्य नाईक यांच्यापुढचे अडथळे दूर करून अध्यक्षपदासाठी त्यांचा मोकळा केला. आता उपाध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलमधून जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. खजिनदारपदासाठी अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे अशी लढत होईल. सचिवपदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेष खानविलकर आणि सहसचिवपदासाठी गौरव पायडे विरुद्ध निलेश भोसले अशी लढत होणार आहे.
advertisement

जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी आशिष शेलार यांचा प्रचार!

"आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच शरद पवार साहेब असो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, या सगळ्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत, उद्या ३ ते ६ वाजेपर्यंत मतदान करून 'पवार-शेलार' पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा", असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.
advertisement

MCA निवडणुकीतील मतदार कोण? किती जण मतदान करणार?

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकूण २७५ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २१० मैदान क्लब, ७७ कार्यालय क्लब, शाळा आणि महाविद्यालय क्लबचे ३६ प्रतिनिधी, ५२ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मतदान करतील. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे, प्रताप सरनाईक आदी नेतेही मतदानास उत्सुक आहेत.
advertisement

अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड निश्चित

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची सलग दुसऱ्यांदा निवड होणार आहे, आज दुपारी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल. अध्यक्षपदासाठी यंदा अनेक दिग्गज राजकारणी नेत्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत योग्य वाटाघाटी करून नाईक यांच्या मार्गातले अडथळे दूर केले गेले. अर्ज माघारी घ्यायला पाच-दहा मिनिटे शिल्लक असताना भाजप नेते प्रसाद लाड, सेना नेते विहंग सरनाईक, क्रिकेटर डायना एडल्जी यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MCA Election : जितेंद्र आव्हाडांना विजयी करा, भाजपच्या आशिष शेलारांकडून प्रचार, आजच्या मतदानाकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement