Pune News: पतीची कमाई 1083 कोटी, कोर्टाला लावला चुना, आता बायकोला द्यावी लागली 7 पट पोटगी

Last Updated:

मुंबई उच्च न्यायालयाने पतीच्या १००० कोटींच्या संपत्तीची माहिती लपवल्यामुळे पोटगी ५० हजारांवरून ३.५ लाख केली आणि ४२ लाख थकबाकी भरण्याचे आदेश दिले.

News18
News18
आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वेगानं वाढत आहे. घटस्फोटानंतर पत्नीला पोटगी कमी द्यावी लागेल यासाठी पतीने कोर्टासमोर आपली खरी कमाई लपवण्याचा जो प्रयत्न केला, तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नजरेतून सुटला नाही. पतीने केलेल्या या लबाडीची किंमत आता त्याला मोजावी लागणार आहे. ही केवळ पोटगी वाढवण्याची साधी केस नाही, तर एका अत्यंत श्रीमंत कुटुंबातील पुरुषाने आपल्या विभक्त पत्नीला सामान्य आयुष्य जगण्यापासून रोखण्याचा केलेला हा प्रयत्न होता, जो कोर्टाने पूर्णपणे मोडून काढला.
कोर्टाने पकडला चालाकीचा डाव
या प्रकरणी न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेशन यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. पतीने कोर्टाला आपली आर्थिक परिस्थिती चुकीची आणि खोटी सांगितली, हे खंडपीठाने स्पष्टपणे हेरले. पतीने कोर्टासमोर 'मी वर्षाला फक्त ६ लाख रुपये कमावतो' असा दावा केला होता. कोर्टाने हा दावा 'हास्यास्पद' असल्याचं म्हटलं. पतीच्या कुटुंबाचे १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे मोठे रिअल इस्टेटचे साम्राज्य आहे. यानंतर कोर्टाने कठोर निर्णय घेत, पतीला पत्नीला द्यावी लागणारी मासिक पोटगी ५० हजार रुपयांवरून थेट ३.५ लाख रुपये करण्याचा आदेश दिला.
advertisement
१६ वर्षांचा संसार, घटस्फोट आणि पोटगीचा वाद
बार अँड बेंचच्या अहवालानुसार, या दाम्पत्याचा विवाह १९९७ मध्ये झाला होता आणि २०१३ मध्ये विभक्त होण्यापूर्वी त्यांनी १६ वर्षे संसार केला. फेब्रुवारी २०२३ मध्ये, पुणे येथील कुटुंब न्यायालयाने पतीने दाखल केलेली क्रूरतेच्या आधारावरील घटस्फोटाची याचिका मंजूर केली होती. त्यावेळी कोर्टाने स्थायी पोटगी म्हणून पत्नीला दरमहा ५०,००० रुपये देण्याचे निश्चित केले होते. या निर्णयावर दोन्ही बाजूंनी अपील दाखल करण्यात आले होते. पत्नीने पोटगी वाढवण्याची मागणी केली, तर पतीने 'माझ्याकडे देण्यासारखे साधन नाही' असे कारण देत पोटगी रद्द करण्याची मागणी केली होती.
advertisement
पतीनं दिली खोटी माहिती
नवऱ्याचा व्यवसाय 1083 कोटी रुपयांचा आहे. इतकंच नाही तर तो अनेक फर्ममध्ये देखील पार्टनर आहे.त्याच्याकडे जमिनी जमीन देखील आहे. ही सगळी माहिती पतीने कोर्टापासून लपवून ठेवली होती. इतकंच नाही तर आधीच मेंटेन्स दिला आहे असं सांगून तो कोर्टात हजर राहण्यासाठी टाळाटाळ करायचा. पुणे फॅमिली कोर्टानं 50 हजार रुपये महिलेला पोटगी द्यावी असे निर्देश दिले होते. मात्र जेव्हा पत्नीला समजलं पती खोटं बोलला आहे तेव्हा तिने हायकोर्टात न्यायासाठी गेली तेव्हा पतीला मोठा धक्का बसला.
advertisement
मुंबई हायकोर्टानं स्पष्टच सांगितलं
उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, पती कुटुंबाच्या रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग आणि फायनान्ससह अनेक व्यवसायांमध्ये सहभागी आहे, ज्यांची एकूण किंमत १,००० कोटी रुपयांहून अधिक आहे. पतीने आपल्या खात्यातून भावाच्या खात्यात १० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केल्याचे पुरावेही कोर्टाला मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पतीने कोर्टाला असे सांगितले की, विभक्त झालेल्या पत्नीने आपल्या मुलीचे योगा, संगीत आणि बेकिंग क्लासेसचे खर्च कमी करावेत. या युक्तिवादावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितले की, "असा युक्तिवाद पितृसत्ताक (Patriarchal) विचारधारेचे उदाहरण आहे." एका पत्नीला तिच्या मुलीच्या भविष्यासाठी खर्च करण्याचा हक्क आहे, हे कोर्टाने ठणकावून सांगितलं.
advertisement
४२ लाखांची थकबाकी भरण्याचे निर्देश
कोर्टाने केवळ पोटगी वाढवली नाही, तर पतीने केलेल्या चालबाजीबद्दल त्याला कठोर दंडही ठोठावला. पतीने वाढीव पोटगीनुसार, मागील एका वर्षाची थकबाकी भरण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार, पतीने पुढील चार आठवड्यांच्या आत ४२ लाख रुपये वर्षभराचे कोर्टात जमा करावे लागतील. पतीने आपली आर्थिक स्थिती जाणूनबुजून लपवण्याचा प्रयत्न केल्याचा हा थेट परिणाम आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News: पतीची कमाई 1083 कोटी, कोर्टाला लावला चुना, आता बायकोला द्यावी लागली 7 पट पोटगी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement