नगरपरिषद निवडणुकीला राड्याचं ग्रहण, कुठे हाणामारी तर कुठे दगडफेक; वाचा कुठे कुठे लागलं गालबोट?

Last Updated:

Nagar Parishad Election: ऐन नगरपरिषदा निवडणुकीत महायुतीतल्याच मित्रपक्षातील कार्यकर्ते भिडल्यामुळे ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापलं. 

News18
News18
मुंबई:  राज्यातील 264 नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र आजचा दिवस राड्यांमुळे गाजला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मतदान केंद्राबाहेर हाणामारी झाली. मुख्यत्वे महायुतीतल्याच मित्रपक्षातील कार्यकर्ते भिडल्यामुळे ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापलं.

रायगड महाड 

महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.शिवसेनेचे विकास गोगावले आणि आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांचे समर्थक भिडले. सुशांत जाबरेंच्या समर्थकांनी विकास गोगावलेंवर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.या राड्यावरून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.
advertisement

गेवराई 

बीडच्या गेवराई येथे नगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. गेवराई शहरातील मोंढा भागात असलेल्या मतदान केंद्राबाहेर पवार आणि पंडित गट समोरासमोर आले. यावेळी मारहाणीची घटनाही घडली. त्यानंतर गेवराईचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर उभा असलेल्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या राड्यादरम्यान गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत जमाव पांगवला आहे.या राड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाची एक अतिरिक्त तुकडी देखील तैनात करण्यात आली
advertisement

बीड

बीड शहरातील शाहू नगर भागातही राडा झालाय आहे.यावेळी दगडफेकीची घटना घडली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव

जळगावच्या मुक्ताईनगरांत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मतदान केंद्रावर असलेल्या पोलिसांवरच रक्षा खडसे या संतापल्याचं दिसून आले होते. भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे हा संताप झाला. त्यामुळे शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण दिसून आल्या.
advertisement

बदलापूर

बदलापुरातही शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने -सामने आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्तेमध्ये धक्काबुक्की आणि हाणामारीची घटना घडली आहे.

पालघर

पालघरच्या डहाणू येथे मतदान केंद्राबाहेर वाद झाला आहे.शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याने वाद झाल्याची माहिती आहे..यातूनच या दोन्ही पक्षांच्या वाद उफाळून आल्याची माहिती मिळतेय...
advertisement

नाशिक

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या नूतन त्रंबकेश्वर विद्यालयातल्या मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधीमध्ये बाचाबाची झालीय
गावगाड्याच्या या निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येनं उतरलेत. अनेक ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र त्याचवेळी काही भागात हाणामारीच्या घटना घडल्यामुळं लोकशाहीच्या या उत्सवाला गालबोट लागलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नगरपरिषद निवडणुकीला राड्याचं ग्रहण, कुठे हाणामारी तर कुठे दगडफेक; वाचा कुठे कुठे लागलं गालबोट?
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement