नाशिकमधील ‘हा’ वर्दळीचा रस्ता बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nashik News: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्दळीचा रस्ता बंद राहणार आहे.
नाशिक : नाशिकमधील भगूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतमोजणी विहितगाव येथील मनपा शाळा क्र.164 च्या इमारतीमध्ये होणार आहे. यामुळे बुधवारी (दि.3) सकाळी सहा वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत विहितगाव-वडनेर-पाथर्डी रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुतर्फा बंद राहणार असल्याची अधिसूचना शहर वाहतूक शाखेकडून जाहीर करण्यात आली आहे.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव मनपा शाळेत होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे अतिरिक्त प्रभारी पोलिस उपायुक्त संदीप मिटके यांनी वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना जारी केली आहे. या मार्गावरील वाहतूक काका हांडोरे चौकातून रोकडोबावाडी-खोलेमळा मार्गे आर्टीलरी सेंटररोडने अनुराधा चौकातून पुढे मार्गस्थ होईल. बदलाचे पालन करणे वाहनचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
advertisement
अवजड वाहतूक इंदिरानगरमार्गे जाणार
view commentsपाथर्डी फाट्याकडून येणारी अवजड वाहने पाथर्डी गाव सर्कल येथून कलानगरमार्गे डावीकडे वळण घेत वडाळागाव-डीजीपीनगर-1 मार्गे पुढे पुणे महामार्गाकडे रवाना होतील, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
December 02, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिकमधील ‘हा’ वर्दळीचा रस्ता बंद राहणार, गैरसोय टाळण्यासाठी पाहा पर्यायी मार्ग


