एका बेडकामुळे पलटल्या दोन रिक्षा, मुंबईजवळ विचित्र अपघातात सात जखमी

Last Updated:

पालघर जिल्ह्याच्या पारोळमध्ये अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. इथं एका बेडकामुळे दोन रिक्षांचा भीषण अपघात झाला आहे.

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो
पालघर जिल्ह्याच्या पारोळमध्ये अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. इथं एका बेडकामुळे दोन रिक्षांचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही एकमेकांना धडकल्याने त्या पलटी झाल्या आहेत. या अपघातात दोन्ही रिक्षा चालकांसह एकूण सात जण जखमी झाले. यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर वसई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एका बेडकामुळे असा भीषण अपघात झाल्याने या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अंबाडी शिरसाड मार्गावरील उसगाव येथे घडली आहे. ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी एका रिक्षामध्ये बेडूक आला होता. रिक्षामध्ये बेडूक असल्याने महिला प्रवासी घाबरल्या. त्यामुळे चालकाने धावत्या रिक्षात बेडूक बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. पण हा बेडूक एका महिला प्रवासाच्या अंगावर पडला. यामुळे महिला घाबरून रिक्षात गोंधळ निर्माण झाला आणि चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं.
advertisement
अनियंत्रित झालेला हा रिक्षा समोरून येणाऱ्या दुसऱ्या रिक्षावर वेगात जाऊन धडकला. या अपघातात दोन्ही रिक्षा पलटी झाल्या. या भीषण अपघातात अपघातात दोन्ही रिक्षाचालकांसह सात जण गंभीर जखमी झाले. यातील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वसई येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात या दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झालं आहे.
advertisement
पण एका बेडकामुळे घडलेल्या या अपघाताची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तसेच जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातात दोन्ही रिक्षाचं मोठं नुकसान झालं असून समोरील भाग पूर्णपणे खराब झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका बेडकामुळे पलटल्या दोन रिक्षा, मुंबईजवळ विचित्र अपघातात सात जखमी
Next Article
advertisement
Pune News : साडे चार तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर आरोपांचा बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळबळ
४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब
  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

  • ४.३० तासांत मतदार यादी बदलली? मविआचा भाजपवर बॉम्ब, CCTV नं पुण्यात खळब

View All
advertisement