आई वडिलांनीच घेतला पोटच्या गोळ्याचा जीव, कारमध्ये घालून मृतदेह पुलाखाली फेकला; संगमनेर हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार ही जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले.
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली एका पाच महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. आई वडिलांनीच त्याचा खून करून विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. मुलाला व्यंग असल्याने आई वडिलांनीच गळा घोटून त्याला नदीत फेकल्याचं समोर आलं आहे.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे 4 डिसेंबर रोजी मुळा नदीकडे गेलेल्या काही लोकांना पुलाखाली चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता.. घारगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि घारगाव पोलिस घटनेचा समांतर तपास करत असताना या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली कार ही जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील असल्याचे समोर आले.
advertisement
पोलिसांनी गावात जावून सखोल माहिती घेतली असता चिमुकल्याच्या आई वडिलांवर संशय बळावला.. पोलिसांनी बालकाचे वडील प्रकाश पंडित जाधव, आई कविता प्रकाश जाधव आणि गाडी चालक हरिदास गणेश राठोड यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी चिमुकल्या शिवांशचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आजाराने ग्रस्त असलेले बाळ बरे होणार नसल्यामुळे गळा दाबून त्याचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याची कबुली आई वडिलांनी दिली आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 09, 2025 5:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई वडिलांनीच घेतला पोटच्या गोळ्याचा जीव, कारमध्ये घालून मृतदेह पुलाखाली फेकला; संगमनेर हादरलं










