इंस्टाग्रामवर तो करायचा ती बनून चॅट, धरणाजवळ बोलवून फलटणच्या युवकाला मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
- Published by:Prachi Amale
Last Updated:
या प्रकरणात युवकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर बनावट महिला प्रोफाइल तयार करून चॅटिंग करणाऱ्या युवकाचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणात युवकाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम अकाउंटवरून महिला असल्याचा बनाव करून चॅटिंगद्वारे एका युवकलाशिरवळजवळील वीर धरण परिसरात बोलावण्यात आले. मात्र, तरुण तिथे पोहोचल्यावर त्याला तीन अनोळखी व्यक्तींनी मारहाण करून लुटले.त्यानंतर संबंधित तरुणाने तात्काळ शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या एका तासाच्या आत तपास चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना अटक केली. महत्त्वाचे म्हणजे यातील एक आरोपी यूट्यूबर आणि एका राजकीय पक्षाचा (मनसे) तालुकाध्यक्ष असल्याचं समोर आले आहे.
advertisement
घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात
शिरवळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये यूट्यूबर किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसेचा तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर सावधगिरी बाळगा
advertisement
या घटनेमुळे सोशल मीडियावर बनावट प्रोफाइलद्वारे होणाऱ्या गैरप्रकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी चॅटिंग करताना किंवा वैयक्तिक माहिती शेअर करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. तसेच कोणतीही धमकी अथवा खंडणीची मागणी झाल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शिरवळ पोलिसांनी केले आहे.
advertisement
पोलिसांची मदत घ्या...
अनेकांसोबत असे प्रकार घडले की स्वतःचे अकाऊंट डिलिट करून मोकळे होतात. पण बनावट फेसबुक अकाऊंट कायम राहते. यामुळे सायबर पोलिसांना तक्रार करण्याची गरज आहे. जेणेकरून तुमच्या नावाचा वापर करणं थांबवलं जाऊ शकेल. यामुळे बदनामी होण्याची भीती न बाळगता यात सायबर पोलीसांची मदत घ्यावी. यासोबत स्वतःच्या मोबाईलच्या मध्यातून काही ठिकाणी प्रायव्हसी सेटिंग करून, तसेच स्वतः विषयी महत्वपूर्ण माहिती पब्लिक न करता हाईड करून ठेवावी जेणेकरून काही प्रमाणात का होईना याला आळा घालता येईल.एखाद्याच्या नावाचे दुसरेच फेसबुक अकाऊंट वापरत लोकांची फसवणूक केली जात आहेत. त्यामुळे सोशल माध्यमे वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
November 12, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
इंस्टाग्रामवर तो करायचा ती बनून चॅट, धरणाजवळ बोलवून फलटणच्या युवकाला मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक


