पोरांनो तयारीला लागा, पिंपरी चिंचवड पोलीस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pimpri Chinchwad Police Recruitment: पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस शिपाई (Police Constable) पदांच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस शिपाई (Police Constable) पदांच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत कधी
322 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. शहराची कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ही भरती प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पदांचे तपशील आणि आरक्षण
advertisement
जाहीर झालेल्या एकूण ३२२ पदांचे वाटप विविध प्रवर्गांनुसार (Reservation Category) करण्यात आले आहे. आरक्षणाचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
जनरल (General) प्रवर्गासाठी: ९७ जागा
महिला (Women) प्रवर्गासाठी: ९७ जागा
माजी सैनिक (Ex-Servicemen): सर्वाधिक ४८ जागा
खेळाडू (Sports Persons): १६ जागा
प्रकल्पग्रस्त (Project Affected): १६ जागा
गृह रक्षक (Home Guards): १६ जागा
अंशकालीन पदवीधर : १६ जागा
advertisement
पोलीस कॅडेट्स (Police Cadets): १० जागा
भूकंपग्रस्त (Earthquake Affected): ६ जागा
खरं तर, गेल्या काही काळापासून पोलीस भरती प्रक्रिया खोळंबली आहे. कोरोना काळातही पोलीस भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलीस प्रशासनावरील ताण वाढत जात होता. आता हाच ताण दूर करण्यासाठी आणि शहरात कायदा आणि सुव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीकोनातून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यात विविध प्रवर्गासाठी एकूण ३२२ पदं खुली केली आहेत.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
November 02, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरांनो तयारीला लागा, पिंपरी चिंचवड पोलीस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय?


