चल तुला शाळेत सोडतो, नराधमाने भुलवलं, पुण्यात १४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. ४ डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : महिला सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत असताना पुण्यातील विश्रांतवाडी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. ४ डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ डिसेंबर रोजी हा सगळा प्रकार घडला. अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकमेकांना आधीपासून ओळखतात. आरोपी हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्या दोघांची ओळख एका बसस्टॉपवर झाली होती. ४ डिसेंबर रोजी आरोपीने तिला शाळेत सोडतो असे सांगितले आणि तिला त्याच्या गाडीवर बसून या तरुणाने एका खोलीत नेले आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले
advertisement
मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मुनाकिब नासिर अन्सारी याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 09, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चल तुला शाळेत सोडतो, नराधमाने भुलवलं, पुण्यात १४ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार










