Pune Navale Bridge: ८ वर्षात २१० अपघात, पुण्यातील नवले पुलाचा रक्तरंजित इतिहास वाचून धडकी भरेल

Last Updated:

Pune Navale Bridge Accident History: पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. या पुलावर मागील ८ वर्षात २१० अपघात झाले आहेत.

पुणे- नवले पुलाचा इतिहास
पुणे- नवले पुलाचा इतिहास
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे :पुण्यातील नवले पुलाजवळ गुरूवारी झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेल्या ८ जणांमध्ये ५ पुरुष ३ महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. पुण्यातील नवले पुलावर गेल्या ८ वर्षात २१० अपघात अपघात झाले आहेत.
पुण्यातील कात्रज बोगदा ओलांडल्या नंतर एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यात येणाऱ्या ८ ते १० वाहनांना धडक दिली. पुढे एका कंटेनरला धडक देण्यापूर्वीच त्याच्या समोर असलेल्या चारचाकी वाहनाला धडक दिल्यामुळे ते वाहन दोन्ही कंटेनरच्या मध्यभागी सापडलं आणि अक्षरश अग्नितांडव झालं. घटनास्थळी आगीचे लोण दूरपर्यंत पोहचले. अपघात इतका भयानक होता की मध्यभागी अडकलेल्या चारचाकीचा चक्काचूर झाला होता.
advertisement

नेते आढावा घेतात पण परिस्थिती जैसे थे

गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील नवले पूल हा सातत्याने या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आहे. मागील ८ वर्षात नवले पुलावर २१० अपघात घडले ज्यात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक स्थानिक नागरिक तर या रस्त्यावरून प्रवास करणे टाळतात. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यापासून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत या पुलाबाबत अनेक वेळा चर्चा, बैठका आढावा घेण्यात आल्या मात्र परिस्थिती अजूनही जैसे थे आहे.
advertisement

नवले पुलाला 'डेथ स्पॉट' किंवा 'अपघाताचा हॉटस्पॉट' म्हटलं जातं!

महामार्गाची चुकलेली रचना हे या अपघाताचे मुख्य कारण आहे. बंगलोर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कात्रजचा नवीन बोगदा आहे. हा बोगदा संपला की नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. या उतारामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटतं आणि अपघात घडतात. सततच्या अपघातांमुळे या रस्त्याला किंवा या स्पॉटला 'डेथ स्पॉट' किंवा 'अपघाताचा हॉटस्पॉट' म्हणलं जातं.
advertisement

गेल्या ३ वर्षात नवले पुलावर किती अपघात?

वर्ष: २०२३
एकूण अपघात: ८
मृत्यू: ९
जखमी (किरकोळ आणि गंभीर): २
वर्ष: २०२४
एकूण अपघात: ४
मृत्यू: ५
जखमी (किरकोळ आणि गंभीर): ५
वर्ष: २०२५ (ऑक्टोबर पर्यंत)
एकूण अपघात: १४
मृत्यू: ७
जखमी (किरकोळ आणि गंभीर): ११

नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघातांची प्रमुख ३ कारणे कोणती?

advertisement
-कात्रज बोगदा ओलांडला की तीव्र उतार आहे ज्यामुळे अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणे कठीण होतं
-राष्ट्रीय महामार्ग असल्याने सतत वाहनांची ये जा असते. तसेच सेवा रस्ता (सर्विस रोड) नसल्याने अनेक दुचाकीस्वार येथून वाहने चालवतात
-ट्रक, कंटेनर सारख्या वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी या तीव्र उतारावर आले की गाड्या 'न्यूट्रल' करतात परिणामी वाहनांवरील ताबा सुटतो
advertisement
यावर्षी नवले पुलावर झालेल्या अपघातांची यादी
- २५ जानेवारी २०२५: भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिली ज्यामध्ये २ जणांचा मृत्यू
- ३ मे २०२५: एका महाविद्यालयीन तरुणाने दारू पिऊन मर्सीडिज चालवत एका तरुणाला धडक दिली ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला
-३ मे २०२५: ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने तीन वाहनांना धडक दिली. त्यामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याच दिवशी सकाळी अवजड वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला
advertisement
- ६ ऑगस्ट २०२५: भरधाव येणाऱ्या एका वाहनाने अनेक चारचाकी वाहनांना दिली धडक, सुदैवाने यात जीवितहानी नाही

क्तरंजित मालिका संपणार तरी कधी?

नवले पुलावरून गाडी चालवणं हा अनेकदा भीतीदायक अनुभव असतो. एनएचएआयचे अधिकारी, वाहतूक पोलिस हे सगळे तात्पुरत्या उपाययोजना करून स्वतःची पाठ थोपटून घेतात. पण प्रत्यक्षात जीवघेण्या अपघाताने कितीतरी जणांची कुटुंब उध्वस्त झालीत. अपघाताची ही रक्तरंजित मालिका संपणार तरी कधी हा यक्ष प्रश्न कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Navale Bridge: ८ वर्षात २१० अपघात, पुण्यातील नवले पुलाचा रक्तरंजित इतिहास वाचून धडकी भरेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement